ब्रेकिंग
साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट विद्यालयात विद्यार्थिनींसाठी महाराष्ट्र शासनातर्फे एसटी पास सेवेचा शुभारंभ

0
4
8
0
1
5
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2
बुधवार दिनांक १ जुलै २०२६ रोजी उरण एसटी आगार व्यवस्थापक तुषार गद्रे आणि वाहतूक नियंत्रक रोशन म्हात्रे यांनी साई ट्रस्ट जवाहरलाल नेहरू पोर्ट माध्यमिक विद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यालयातील विद्यार्थिनींसाठी मोफत एसटी पास सेवेचा शुभारंभ केला. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक गिरीश पाटील यांना त्यांनी विद्यार्थ्यांना देण्यात येणारे एसटीचे पास सुपूर्द केले. सदर कार्य गेले अनेक वर्ष शाळेचे आदर्श शिपाई वसंत कडू दादा हे अविरतपणे करत आहेत.
0
4
8
0
1
5




