जि.प. शाळेत दहावीतील प्रथम विद्यार्थिनीच्या हस्ते ध्वजारोहण

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 18
जाफराबाद
येथील पीएमश्री जिल्हा परिषदेत गेल्या चार ते पाच वर्षांपासून स्वातंत्र्यदिनानिमित त आगळावेगळा उपक्रम राबवला जात आहे. यात शाळेतील इयत्ता दहावीत प्रथम क्रमांक आलेल्या विद्यार्थ्यांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. या वर्षीच्या ध्वजारोहणाचा मान धनंजय ढवळे यांची कन्या दिव्या ढवळे हिला मिळाला. तिने – इयत्ता दहावीत ९३ टक्के गुण घेऊन शाळेत प्रथम क्रमांक पटकावला होतד
गेल्या दहा वर्षांपासून वंदे मातरम ग्रुपच्या माध्यमातून पोलीस स्टेशनकडून रोख बक्षीस दिले जाते. या उपक्रमाला ११ वर्षे पूर्ण झाली आहेत. तसेच या शाळेतून जो विद्यार्थी प्रतिवर्षी प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण होतो, त्यास याच शाळेचे
माजी विद्यार्थी प्रा. रवींद्र मगर विनाशुल्क दोन वर्षे शिक्षण देतात. विशेष म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनातून शहरातील तीन विद्यार्थी उच्च पदावर गेले आहेत. यावर्षी व्यापारी महासंघाचे माजी अध्यक्ष अमोल पडघन व गणेश पैठणकर यांच्या वतीने दिव्या ढवळे हिला आरोग्यविषयक वस्तूंची मेडिकल किट देण्यात आली. यावेळी मुख्याध्यापक मनोज साळवे, उमेश दुनगहू, शालेय समितीचे अध्यक्ष शे. अकिल, मोहन मुळे, सुरेश वाकडे, एकनाथ घाटगे, अमोल पडघन, अनिल खंडेलवाल, धनंजय ढवळे, गणेश पैठणकर, कदीर पाशा, संजय खंडेलवाल, मुकेश भारद्वाज, धनंजय ढवळे, पठाण, शुभम लोखंडे, दिलीप बोबडे यांच्यासह शाळेचे शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी व पालकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

