pub-7425537887339079
ब्रेकिंग

झाडे लावा आणि जग वाचवा — चित्रकार संतोष आवटे यांचा अमूल्य संदेश

0 5 0 5 0 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.1

टेंभुर्णी ता.जाफराबाद. जिल्हा जालना येथील प्रसिद्ध चित्रकार संतोष बाबुराव औटी यांनी आपल्या चित्रकलेतून झाडे लावा जग जगवा यांचा अमूल्य संदेश दिलेला आहे. सध्याची परिस्थिती जगात आलेली पाणी ऑक्सिजन तसेच अनेक समस्यांची समस्या झाडे नसण्या मुळे आलेली आहे. ती त्यांनी एक कविता सुद्धा… झाडे लावा झाडे जगवा
झाड जगवा पक्षी वाचवा
झाड जगवा प्राणी वाचवा
झाड जगवा प्राणवायू वाचवा
झाड जगवा माणूस वाचवा
झाड जगवा सृष्टी वाचवा…
संत तुकारामाचे वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे……. वृक्ष वल्ली आह्मां सोयरी वनचरें । पक्षी ही सुस्वरें आळविती ॥१॥

येण े ं सुखें रुचे एकान्ताचा वास । नाही ं गुण दोष अंगा येत ॥२॥

आकाश मंडप पृथुवी आसन । रमे तेथे मन क्रीडा करी ॥३॥

कंथाकुमंडल ु देहउपचारा । जाणवितो वारा अवसरु ॥४॥

हरिकथा भोजन परवडी विस्तार । करोनि प्रकार से रुची ॥५॥

तुका ह्मणे होय मनासी संवाद । आपुला चि वाद आपणांसी ॥६॥

असे तुकाराम महाराजांनी एका अभंगातून मांडले आहे
सिमेंटचे जंगल होत आहे आपली सृष्टी याला थांबवले पाहिजे माणूस आपल्या स्वार्थासाठी सृष्टी नष्ट करायला लागला आहे
उद्या कुणाला जगण्यासाठी ऑक्सिजन हवा आहे तो ऑक्सिजन माणूस नष्ट करत चालला आहे म्हणजे एक प्रकारे निसर्गाच्या विरुद्ध पाऊल टाकने हे धोकादायक ठरणार आहे
तुम्ही झाडे तोडत नाही
तुम्ही स्वतःला नष्ट करत आहात ..
भगवान बुद्धांच्या शिकवणीत आणि बौद्ध तत्त्वज्ञानात निसर्गाविषयी अतिशय सखोल आणि आदरयुक्त दृष्टिकोन मांडण्यात आला आहे. बुद्धांच्या मते, मनुष्य हा निसर्गाचाच एक अविभाज्य भाग आहे आणि मानवी जीवन व निसर्गाचे आरोग्य हे एकमेकांवर पूर्णपणे अवलंबून आहे. आजचा ग्लोबल वार्मिंग मध्ये ते काय असेल आजच्या ब्लोगर वायरिंग पासून वाचायचं असेल तर आज झाडे लावणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. आजच्या जगात आपत्ती व्यवस्थापनामध्ये सर्वांना संदेश देणे गरजेचे आहे. या ठिकाणी घर निर्माण होत असतील त्या ठिकाणी कंपल्सरी झाडे लावणे. याशिवाय घर बांधणीस परवानगी न देणे. जमीन विकत घेताना जमींच्या बंधुऱ्यावर झाडे लावणे हा मोठा संदेश घेऊन जमिनीच्या साठी झाडे लावणे बंधनकारक करणे ही सुद्धा आजच्या डिझास्टर मॅनेजमेंट ची गरज आहे. सरकार व्यवस्था ही आजची जास्त मॅनेजमेंट व्यवस्था करणारी मंडळी यांनी सुद्धा यासाठी लक्ष देणे गरजेचे आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 0 5 0 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे