pub-7425537887339079
ब्रेकिंग

तिरंगा महोत्सव हस्तकला प्रदर्शन विजेत्या विद्यार्थ्यांचा गौरव संपन्न!

0 4 8 6 8 3
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी, दि.8

येथील शैक्षणिक क्षेत्रात कृतीशील व नाविन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या १०० शिक्षक समुह तर्फे भारतीय स्वातंत्र्याच्या ८० व्या. दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांसाठी तिरंगा महोत्सव हस्तकला प्रदर्शन २०२६ चे आयोजन करण्यात आले होते.या स्पर्धेत जिल्ह्यातील २२ शाळातील ४३८ विद्यार्थ्यांनी क्रॉफ्ट पेपर पासून तिरंगा रंगातील वेगवेगळ्या कलाकृती बनविल्या. यातून निवडक कलाकृतीचे प्रदर्शन १५ ऑगस्ट रोजी जालना,गांधीचमन परिसरातील ब्राम्हण सभेच्या सभागृहात भरविण्यात आले होते. या प्रदर्शनास शहरातील विद्यार्थी व नागरिकांनी भेटी देऊन विद्यार्थ्यांनी बनविलेल्या कलाकृतीचे मनापासून कौतुक केले होते. या कलाकृतीच्या परीक्षणासाठी तज्ञ परीक्षक म्हणून मिलिंद दुसे, श्रीनिवास कारमपुरी व श्रीमती कांचन वाघ अंभोरे यांनी काम पाहिले होते. परीक्षकाच्या गुणवत्ता विषयक पसंतीस पडलेल्या विद्यार्थ्यांना गौरव समारंभ दि. ७ सप्टेंबर २०२६ रोजी जालना शहरातील जिप मुलांची प्रशाला येथे पार पडला. हा कार्यक्रम आर.आर. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली तर उपशिक्षणाधिकारी रवी जोशी, गटशिक्षणाधिकारी डॉ. भरत वानखेडे, एम. जी. जोशी, डॉ. गिरीश पाकणिकर,राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षक रामेश्वर आंबेकर, राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षिका डॉ. शिवनंदा मेहेत्रे, जिल्हा पुरस्कार प्राप्त शिक्षिका माया कवानकर,एल.सी.बी. चे पोलीस कर्मचारी संजय सोनवणे, जगत घुगे व राजेभाऊ मगर यांच्या उपस्थितीत पार पडला.विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र तसेच सुरक्षा मंत्र हे पुस्तक देऊन करण्यात आला.
यावेळी शैक्षणिक सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या आर.आर.जोशी. बाळासाहेब आबुज, संजय भुजंग व संजय सोनवणे यांचा विशेष सन्मान १०० शिक्षक समुहा तर्फे करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचलन विलास जमधडे व अप्पासाहेब मुळे यांनी तर आभार प्रदर्शन श्रीमती मनीषा पाटील यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी संदीप इंगोले, विलास जमधडे, अशोक माधवले, विवेक कुलकर्णी,विष्णू बिरादार, राजेश शेवाळे, अमोल कंडारेसह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

5/5 - (1 vote)
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 6 8 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे