pub-7425537887339079
ब्रेकिंग

सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसीमध्ये स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा.

0 4 8 0 9 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18

जिजामाता ग्रामीण विकास व शिक्षण संस्था संचालित सुप्रिया कॉलेज ऑफ फार्मसी, टेंभुर्णी येथे भारताचा ८० वा स्वातंत्र्य दिन देशभक्तीपूर्ण व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी संस्थेचे संस्थापक मा.श्री.संजय लहाने सर यांच्या प्रमुख उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात सकाळी ७.३० वाजता ध्वजारोहणाने झाली.त्यानंतर राष्ट्रगीताचे सामूहिक गायन करण्यात आले. महाविद्यालय परिसरात तिरंगी सजावट करण्यात आल्याने संपूर्ण वातावरण देशभक्तीने भारावून गेले होते.

यावेळी संस्थेचे संस्थापक मा.श्री.संजय लहाने सर यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा देत देशाच्या प्रगतीमध्ये युवकांची भूमिका महत्त्वपूर्ण असल्याचे सांगितले.विद्यार्थ्यांनी शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेची भावना जोपासावी,असे आवाहन त्यांनी केले.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.मुजाहिद नसिर पठाण यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना स्वातंत्र्य दिनाचे ऐतिहासिक महत्त्व, स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान आणि देशाच्या विकासासाठी तरुण पिढीची जबाबदारी यावर प्रकाश टाकला. विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग समाज व राष्ट्राच्या विकासासाठी करावा, असे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमास विभागप्रमुख प्रा. अर्पित राजाराम सुरळकर, तसेच प्रा. एस. एन. सोनसाळे, प्रा.पी. पी. बनकर, प्रा. के. ए. चेके, प्रा. मो. आदिल, प्रा. ए. ए. काकड, प्रा. व्ही. बी. बिडवे, प्रा. अयान शेख, प्रा. मो. हातिम, प्रा. ए. एस. गवई, प्रा. एम. एस. खलसे, प्रा. ए. जे. बारगुडे , श्री. राजेंद्र बी. साखरे, श्री. अजय महामुने, श्री. के. बकाल आणि श्री. एम. पांडव यांचीही उपस्थिती होती.

विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर भाषणे व विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये देशप्रेम, राष्ट्रीय एकात्मता, सामाजिक जबाबदारी आणि राष्ट्रनिर्मितीची भावना वृद्धिंगत करण्यात आली.

स्वातंत्र्य दिनाचा हा कार्यक्रम उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात यशस्वीरीत्या संपन्न झाला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 0 9 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे