आज – काल लोकं म्हणतात की, काँग्रेसचं काहीही खरं नाही. कॉग्रेसचं काही खरं नसतं तर मी खासदार झालो असतो का? कॉग्रेस कुणीही संपवू शकत नाही, असे रोखठोक प्रतिपादन जालन्याचे खासदार डॉ. कल्याणराव काळे यांनी येथे बोलतांना केले.
खा. डॉ. काळे कॉग्रेसच्या नवनियुक्त पदाधिकार्यांच्या सत्कार सोहळ्यात बोलत होते. यावेळी विचार पीठावर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष कल्याणराव दळे, राजेंद्र राख, राजेंद्र गोरे, सुभाषराव कोळकर, माजी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख, डॉ. विशाल धानुरे, सुनिल चौधरी, बदर चाऊस आदींची उपस्थिती होती. प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मॉ जिजाऊ यांंच्या प्रतिमेंचे पुजन करण्यात आले. पुढे बोलतांना डॉ. काळे म्हणाले की, पुर्ण आमदार आणि जि. प. अध्यक्ष व पं. स. अध्यक्ष हे देखील कॉग्रेसचे व्हायला पाहिजेत. काँग्रेस कशी पुढे जाते व ती कुणाच्या भरवशावर नाही. ज्यांना जायचे होते ते गेले, मात्र आता कुणीही कुठे जाणार नाही, त्यामुळे चिंता करण्याची गरज नाही. मग पहा कसे आपले आमदार, खासदार होत नाहीत ते!, काही जण म्हणतात की, मी संभाजीनगर मधून उभं राहणार आहे, पण ते खोटं आहे, असेही खासदार डॉ. कल्याणराव काळे म्हणाले.
या कार्यक्रमास जिल्ह्यातील अंबड, घनसावंगी, बदनापूर, भोकरदन, जाफ्राबाद, मंठा, परतूर येथील सर्व नवनियुक्त तालुकाध्यक्ष, सरचिटणीस, सचिव, विविध पदाधिकारी व महिला तसेच राजाभाऊ कुलकर्णी, अशोकराव उबाळे, आणि जिल्हाभरातील कॉग्रेसचे पदाधिकारी व कायर्र्र्कर्ते उपस्थित होते.