pub-7425537887339079
ब्रेकिंग

एमबीबीएस पदवी पूर्ण केल्याबद्दल डॉ. साळवे, डॉ. मोठे यांचा मानव सेवा मंडळातर्फे सत्कार

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.24

टेंभुर्णी येथील डॉ. नागेश रमेश साळवे व डॉ. अजय रमेश मोठे यांनी नुकतीच एमबीबीएस पदवी पूर्ण केली आहे. या यशाबद्दल गावातील सेवाभावी संस्था असलेल्या मानव सेवा मंडळातर्फे बुधवारी एका कार्यक्रमात त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मंडळाच्या सदस्यांनी मनोगत व्यक्त करताना, या दोन्ही डॉक्टरांनी सामाजिक बांधिलकी जपत ग्रामीण भागातील रुग्णांना समर्पित आरोग्य सेवा द्यावी, असा आशावाद व्यक्त केला. तर आपण व्यवसाय म्हणून नव्हे, तर सेवा म्हणून कर्तव्य पार पाडू, अशी भावना डॉ. नागेश व डॉ. अजय यांनी सत्काराला उत्तर देताना व्यक्त केली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व आभार संजय राऊत यांनी मानले. यावेळी मानव सेवा मंडळाचे प्रांत सचिव नसीम शेख, भागाजी वाघमारे, दत्तू मुनेमाणिक, गजानन डोमळे, सुरेश बोर्डे, संजय राऊत, गोविंद जाधव, बालाजी मगर, प्रदीप मुळे, प्रा. सैलीप्रकाश वाघमारे, डॉ. रमेश मोठे, रमेश साळवे, ज्ञानेश्वर उखर्डे, गणेश धनवई, भिकनखा पठाण, शेख साबेर, मुरली कुमकर, सांडू उखर्डे, शेख सैफ आदींची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे