गाडेगव्हाण येथे विद्यार्थ्यांना मोफत दप्तर वाटप

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.21
युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया यांच्या वतीने गाडेगव्हाण येथील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता १ ली ते ५ वीच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत दप्तरांचे वाटप करण्यात आले.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी तसेच त्यांच्या शिक्षणाला प्रोत्साहन मिळावे, या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. विद्यार्थ्यांना दप्तर मिळाल्याने त्यांच्यामध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले.
या कार्यक्रमाला युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडियाचे अध्यक्ष दुर्गेश बनकर, उमेश गिराम, वैभव लाखोले, आदित्य सरदार, दत्ता देठे, शालेय समिती अध्यक्ष संतोष बनकर, मुख्याध्यापक खरात सर तसेच फलके सर यांची उपस्थिती होती.
युनायटेड ग्लोबल फेडरेशन इंडिया यांच्या वतीने भविष्यातही विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विविध उपक्रम राबविण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
