“पोस्टाचे कामगार कालानुरूप बदल स्वीकारत आहेत. येणाऱ्या काळात आव्हान असणारच आहे. स्वतःला सतत अपडेट ठेवणे आणि माणुसकी हा धर्म समजून काम करणे गरजेचे आहे. मी समाजासाठी काम करत असताना जात-धर्म पाहत नाही. माणुसकी हाच खरा धर्म आहे, हे माझ्या ह्रदयात कोरलेले आहे,” असे आंतरराष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत पनवेल येथे रविवारी (ता. २६ )पोस्टल युनियनच्या दहाव्या द्विवार्षिक अधिवेशनात बोलताना म्हणाले. यावेळी पोस्टल युनियनच्या वतीने महेंद्रशेठ घरत यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलचे महापौर नितीन पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
महेंद्रशेठ घरत पुढे म्हणाले, “रामशेठ ठाकूर यांनी व्यवसायात स्थिरस्थावर झाल्यावर रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ स्थापन केले. या माध्यमातून शेकडो सामाजिक कामे करण्यात आली. भगत साहेबांच्या नावाने शैक्षणिक संस्था काढली. तिचे नाव राज्यातील आघाडीच्या शैक्षणिक संस्थांत आहे. दर्जेदार स्पोर्टस् कॉम्प्लेक्स उभारून त्यांनी खेळाडूंना व्यासपीठ दिले. मी राजकारणविरहित काम करत असल्याने सर्वपक्षीयांना एका व्यासपीठावर आणण्याची किमया करतो.”
नॅशनल युनियन ऑफ पोस्टल एम्प्लॉइज यांच्या संयुक्त विद्यमाने हे अधिवेशन पनवेल येथे आयोजित करण्यात आले होते. यावेळी पोस्टाचे कर्मचारी आणि युनियन प्रतिनिधी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
दिव्यांग,वृध्द,निराधाराना हक्क द्या नसेल तर स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत २५ नोव्हे. २०२६ जिल्हाधिकारी नांदेड येथे बे मुध्दत धरने आंदोलनाचा निवेदनाद्वारे चंपतराव डाकोरे पाटिल यांनी दिला ईशारा
9 hours ago
शेकापचे उरण तालुका चिटणीस रवी घरत यांच्या हस्ते रायगड तोफच्या ” देवमाणूस” या अंकाचे प्रकाशन उत्साहात संपन्न.
10 hours ago
जायकवाडी या नव्याने प्रस्तावित असलेल्या सुमारे बाराशे कोटी रुपये खर्चाच्या समांतर पाणी पुरवठा योजनेचे फुकटचे श्रेय घेण्याचा प्रयत्न कुणीही करू नये-कैलास गोरंटयाल
10 hours ago
सारडे विकास मंच आयोजित किल्ले स्पर्धेला उदंड प्रतिसाद; ६८ किल्ल्यांची नोंदणी
10 hours ago
विभागीय शालेय कराटे स्पर्धेत माहोरा येथील खेळाडूंची दमदार कामगिरी; दोघांची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड
10 hours ago
जाफराबाद तालुक्याच्या वरिष्ठ निवड श्रेणी चे ट्रेनिंग टेंभुर्णी ला, गट शिक्षणअधिकारी तलत मॅडम, डॉक्टर प्रकाश मांन्टे यांची भेट
10 hours ago
खानापूरच्या सुपुत्राची आंतरराष्ट्रीय स्तरावर भरारी!
3 days ago
धनुष्यबाण स्पर्धेत सिद्धार्थ महाविद्यालयाच्या खेळाडूंनी केली कांस्यपदकाची कमाई…..
3 days ago
भाऊ बहीण हे नातं जगात अनमोल आहे —- चित्रकार संतोष आवटी
3 days ago
दिघोडे वीज उप केंद्र (सब स्टेशन)चा प्रश्न लागणार मार्गी.