राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.16
स्थानिक राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी येथे ७९ वा स्वातंत्र्य दिन अत्यंत उत्साहात व देशभक्तीच्या वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमांचे पूजन करून दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर जिजाऊ वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ढेंबरे यांच्या शुभहस्ते सन्मानपूर्वक ध्वजारोहण करण्यात आले. या सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी मा. संजयजी लहाने यांची प्रमुख उपस्थिती होती.
ध्वजारोहणानंतर शाळेचे मुख्याध्यापक मा. संजय फलटणकर यांनी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व पटवून देत मोलाचे मार्गदर्शन केले.
या प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मन जिंकली. यामध्ये मुख्यत्वे लेझिम, डंबल्स आणि देशभक्तीवर आधारित प्रभावी स्किटचा (नाटिका) समावेश होता. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणाला उपस्थितांनी उत्स्फूर्त दाद दिली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता सुद्रीक्त यांनी अत्यंत उत्कृष्टपणे केले. हा सोहळा यशस्वी पार पाडण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालकांनी मोलाचे सहकार्य केले.




