अधिक मासानिमित्त पेंढारे परिवारात ‘लेक-जावयाच्या’ कौतुकाचा सोहळा

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.6
जाफ्राबाद तालुक्यातील टेंभुर्णी येथील पेंढारे परिवारात धोंड्याच्या जेवणाची धूम टेंभुर्णीत: सध्या सुरू आहे पवित्र ‘अधिक ज्येष्ठ मासाच्या’ निमित्ताने टेंभुर्णी शहरासह ग्रामीण भागात कौटुंबिक उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. या पवित्र महिन्यात लाडकी लेक आणि जावयाचे विशेष आदरातिथ्य करण्याची जुनी परंपरा असून, टेंभुर्णीत सध्या ‘धोंड्याच्या जेवणाची’ मोठी लगबग सुरू आहे.हिंदू धर्मशास्त्रानुसार अधिक मासात जावयाला भगवान विष्णूचे रूप मानले जाते. या निमित्ताने जावयाला माहेरी आमंत्रित करून पारंपरिक पद्धतीने तयार केलेले ३३ पुरणाचे धोंडे आणि पंचपक्वान्नाचे जेवण दिले जात आहे. तांब्याच्या ताटात हे धोंडे ठेवून जावयाला विशेष ‘वाण’ (भेट) देण्याची लगबग माता-पित्यांमध्ये दिसून येत आहे. सोहळ्यादरम्यान केवळ परिवारानेच लेकीचे लाड केले नाहीत, तर विवाहित लेकीनेही आपल्या माहेरी येऊन आई-वडिलांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तिने आईला साडी-खण देऊन तिची ओटी भरली पेंढारे परिवारातील या कौटुंबिक सोहळ्यामुळे घरातील वातावरण अतिशय आनंदमयी आणि आध्यात्मिक बनले होते. पेंढारे परिवाराचा सोहळा टेंभुर्णी गावात चर्चेचा ठरला आहे

