pub-7425537887339079
ब्रेकिंग

टीईटी पेपर फुटी प्रकरणी शालेय शिक्षण मंत्री यांचा राजीनामा व परीक्षा परीषद प्रमुखावर कार्यवाही करावी – मराठवाडा शिक्षक संघाची मागणी

राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

0 4 7 9 9 4
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.29

टीईटी पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद प्रमुखांवर निलंबनाची कारवाई करावी व राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घेण्यात यावा असी मागणी मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने संघटनेचे अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव व सरचिटणीस राजकुमार कदम यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आसल्याची माहिती शिक्षक संघाचे केंद्रीय कार्यकारणी सदस्य बंडू अघाव यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. या विषयी अघाव यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, शिक्षक पदवी आणि पदविका धारण केलेल्या भावी शिक्षकांना आरटीई नुसार ‘टीईटी’ परीक्षा उत्तीर्ण असणे बंधनकारक आहे. त्यानुसार लाखो भावी शिक्षक या परीक्षेची तयारी करतात. मा.सर्वोच्च न्यायालयाने पाच वर्षे सेवा राहिलेल्या शिक्षकांचा अपवाद करून सर्व कार्यरत शिक्षकांना टीईटी बंधनकारक केली आहे. त्यामुळे लाखो शिक्षक या परीक्षेच्या कक्षेत आले आहेत. भावी व कार्यरत शिक्षकांनी २८ जूनच्या परीक्षेची जोरदार तयारी केली होती परंतु,आदल्या दिवशीच टीईटीचा पेपर फुटल्याचे निष्पन्न झाले आणि परीक्षा रद्द करण्यात आली. देशात व राज्यात पेपरफुटीचा रोग लागला आहे त्याचे कारण जबाबदारी आणि कारवाई नाही.शासन कर्त्यांचा प्रशासकीय यंत्रणेवर वचक व धाक राहिला नसल्यामुळे यंत्रणा मस्तवाल झाल्या आहेत, बेफिकीर झाल्या आहेत. आमचे कुणीही काही करू शकत नाही,या अविर्भावात वावरत आहेत. टीईटी पेपरफुटीला महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आणि राज्याचा शालेय शिक्षण विभाग जबाबदार आहे.त्यांच्या या बेफिकिरी मुळे त्यांच्या विरोधात भावी व कार्यरत शिक्षकांमधे तीव्र असंतोष व चिड निर्माण झालेली आहे. याची उचित दखल घेऊन परीक्षा परिषद प्रमुखांवर निलंबनासारखी कडक कारवाई करण्यात यावी आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांचा राजीनामा घेण्यात यावा. अशा कडक कारवाईने धाक आणि जबाबदारीचे भान निर्माण होईल. व अशा अप्रिय घटना भविष्यात घडणार नाहीत असे दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे. प्रसिद्धी पत्रकावर संघटनेचे मार्गदर्शक पी.एस.घाडगे,व्ही.जी.पवार अध्यक्ष सुर्यकांत विश्वासराव, सरचिटणीस राजकुमार कदम,ए.बी.औताडे, ज्ञानोबा वरवट्टे, गुठे एस.जी.,पवार टी.जी.माळी एन.जी.,रेखा सोळुंके, अशोक मस्कले, बंडू अघाव, मधुकर जोंधळे, रातोळे जी.जी.,कुरेशी ए.एन.,राठोड पी.आर.,सुर्यवंशी आर.एन.,कदम व्ही.जी.,कौशल्य जी.पी.,पाटोदेकर ए.डी,सोळंके एन.टी.,वऱ्हाड बी.ए.,तिर्थकर एस.एस.,जमादार एफ.जी.,पाटील पी.एस.कालीदास धपाटे, व्यंकट चिलवरवार,बसवेश्वर स्वामी, शेरखाने जे.एस.,रमेश आंधळे, यशवंत मकरंद, हरिभाऊ भडके,हाळदे के.एम.गणेश आजबे,भाई चंद्रकांत चव्हाण, रविंद्र वाकोडे, जी.व्ही.माने,विक्रम मायाचारी,संजय यळवंते,जगन वाघमोडे, कदम एन.टी.,ढेंगळे व्ही.एस. आदिंची नावे आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 9 9 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे