pub-7425537887339079
ब्रेकिंग

जिल्हा सामान्य रूग्णालय नांदेड येथे फिजोथेरपि मशिन वर दोन मिनिटाचा वेळ जिल्यातील येणाऱ्या सामान्य रूग्ण बरा होईल का? चंपतराव डाकोरे पाटील

0 4 7 3 5 0
[sp_wpcarousel id="1375"]

नांदेड/प्रतिनिधी,दि.30

नांदेड जिल्हा सामान्य रूग्णालय श्री गुरू गोविंद सिंग हॉस्पिटल नांदेड येथे दि. २९ जुलै २०२६ रोजी दोन्ही पायाने दिव्यांग असलेले व दिव्यांग,वृध्द,निराधार मित्र मंडळ महाराष्ट्र संस्थापक अध्यक्ष चंपतराव डाकोरे पाटील यांनी फिजोथेरपि घेण्यासाठी गेले असता त्यांना लाईन मध्ये अकरा वाजता फिजोथेरपि मशिन लावण्यात आली. ती फक्त दोन मिनिटे त्यावेळी डाकोरे यांनी डॉ. कडे विनंती केली सर मी दिव्यांग आहे मला खुप त्रास होतो.व मला येण्या जाण्यासाठी तिनशे रूपये ऑटो खर्च येतो व वेळ जातो तुम्ही दोन मिनिटात मशिन वर मला त्यांचा लाभ होईल काय असे प्रश्न विचारले असता पेंशट गर्दि पहा सर्वाना सेवा द्यावी लागते असे ऊतर मिळताच डाकोरे यांनी जिल्हा शल्यचिकित्सक यांना फोनवर तक्रार केली.
मा. जिल्हाशल्यचिकित्सक यांनी सुचना करता पुन्हा दहा मिनिटे मशिनवर फिजोथेरपि दिली.
मा.जिल्हा शल्यचिकित्सक साहेब विषेश लक्ष द्यावे कारण जिल्ह्यातील रूग्न आपला आजार कमी व्हावा म्हणून गोरगरीब रुग्ण आशेने येतात त्यासाठी फिजोथेरपि कर्मचारी वेळेवर येत नाही, वेळेच्या आत पेशन्टला दोन मिनिटे देऊन शेवटी निवांत राहात असल्याचा अनुभव आहे. तरी कर्तव्य दक्ष जिल्हा शल्यचिकित्सक साहेबानी विषेश लक्ष देऊन गोरगरिबांना आपल्या रूग्णालयात वेळेवर सेवा देण्यात यावी सेवेत कुचराई करणाऱ्या कर्मचारी यांची चौकशी करून योग्य कार्यवाही करण्यात यावी असे चंपतराव डाकोरे पाटील यांनी प्रसिद्धी दिली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 3 5 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे