कोकण ज्ञानपीठ उरण वाणिज्य व कला महाविद्यालय, उरण-रायगड येथे फोटोग्राफी प्रमोशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच Department of Lifelong Learning & Extension (DLLE) आणि Department of Geography यांच्या सहकार्याने फोटोग्राफी अभ्यासक्रमाचा ओरिएंटेशन कार्यक्रम उत्साहात आयोजित करण्यात आला.कार्यक्रमासाठी प्रसिद्ध छायाचित्रकार व पद्मश्री पुरस्कारप्राप्त सुधाकर ओलवे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. विद्यार्थ्यांना फोटोग्राफीचे महत्त्व, छायाचित्रणातील विविध संधी, तंत्रज्ञानाचा वापर तसेच फोटोग्राफी या कौशल्याधारित क्षेत्रातील करिअरच्या संधी याबाबत मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वाल्मिक व्ही. गर्जे यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाविद्यालयातील सर्व प्राध्यपक व शिक्षकेतर कर्मचारी यांना कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले होते.
फोटोग्राफीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव मिळवून देणारा आणि त्यांना व्यावसायिक कौशल्ये विकसित करण्यासाठी प्रेरणा देणारा हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. हा अभ्यासक्रम दर शनिवारी महाविदयालयामधे घेण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. डी.पी. हिंगमिरे यांनी केले तर कार्यक्रमाची प्रस्तावना डॉ. ए. के. गायकवाड यांनी केली व पाहुण्याचे स्वागत डॉ. ए.आर कांबळे यांनी केले व आभार जेष्ठ व सहयोगी प्रा. वाणिज्य विभाग प्रमुख वि.एस इंदुलकर यांनी व्यक्त केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व प्रशिक्षणास प्रवेश घेतलेले विद्यार्थी उपस्थित होते.