जालन्याच्या सुपुत्राची चंदेरी दुनियेत भरारी! सातेफळचा अमोल पाटोळे झळकणार मुख्य भूमिकेत

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.22
जाफराबाद तालुक्यातील जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर ग्रामीण भागातील तरुणही आकाशाला गवसणी घालू शकतात, याचाच प्रत्यय जाफ्राबाद तालुक्यातील सातेफळ येथील तरुण कलावंत अमोल छबुराव पाटोळे याने दिला आहे अतिशय खडतर परिस्थितीवर मात करत, आपल्या अंगभूत अभिनय कौशल्याच्या जोरावर अमोलने एका आगामी मराठी समाजप्रबोधनपर गीतात मुख्य भूमिका साकारली असून, त्याच्या या यशाचे सर्वत्र कौतुक होत आहे दिग्गज कलाकारांची साथ या विशेष मराठी गीतामध्ये अमोल पाटोळे याला महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध अभिनेत्री चित्रा दीक्षित यांची साथ लाभली आहे हे दोघेही या गीतात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत तांत्रिक बाजू भक्कम करण्यासाठी कोरिओग्राफर म्हणून सुनील कोरके आणि कॅमेरामन म्हणून राहुल निकम यांनी जबाबदारी सांभाळली आहे या गाण्याच्या चित्रीकरणाचा शुभारंभ सामाजिक क्षेत्रातील नामवंत व्यक्तिमत्व, अॅड विलास साबळे (संस्थापक अध्यक्ष, मातंग युथ फेडरेशन, महाराष्ट्र राज्य) यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी त्यांनी अमोलच्या जिद्दीचे कौतुक करत ग्रामीण भागातील कलावंतांना अशाच व्यासपीठाची गरज असल्याचे प्रतिपादन केले स्थानिक कलावंतांचा मेळा ——————————— विशेष म्हणजे या प्रकल्पामध्ये स्थानिक कलागुणांना वाव देण्यात आला आहे यामध्ये सहकलाकार म्हणून खालील कलावंतांनी आपली भूमिका चोख बजावली आहे: संदीप पाटोळे, प्रदीप पाटोळे, अजय खंदारे प्रशांत पाटील, प्रतीक खंदारे, विशाल फंटे तुषार खंदारे, लक्ष्मी खंदारे, निशा अंभोरे आणि श्रुती तांबे “परिस्थिती कितीही कठीण असली तरी कला आणि कष्टाची साथ सोडली नाही, तर यश नक्की मिळते सातेफळसारख्या छोट्या गावातून इथपर्यंतचा प्रवास आव्हानात्मक होता, पण सर्वांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाले” — अमोल छबुराव पाटोळे ग्रामीण भागातून अभिनय क्षेत्रात नावलौकिक मिळवणाऱ्या अमोल पाटोळेचे हे पाऊल भविष्यात अनेक तरुणांसाठी प्रेरणादायी ठरणार आहे फोटो




