pub-7425537887339079
ब्रेकिंग

जाफ्राबाद येथे बकरी ईद उत्साहात साजरी; ईदगाह परिसरात शेकडो भाविकांची उपस्थिती

0 4 3 8 7 0
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.29

जाफ्राबाद शहरासह तालुक्यात बकरी ईदचा पवित्र सण मोठ्या उत्साहात, धार्मिक वातावरणात आणि बंधुभावाने साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मुस्लिम बांधवांनी ईदगाह तसेच विविध मशिदींमध्ये नमाज अदा करून देशात सुख, शांतता आणि ऐक्य नांदावे यासाठी प्रार्थना केली. जाफ्राबाद येथील ईदगाह परिसरात शेकडोच्या संख्येने भाविक दाखल झाले होते. पारंपरिक वेशभूषेत आलेल्या नागरिकांनी एकमेकांना आलिंगन देत ईदच्या शुभेच्छा दिल्या. लहान मुलांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. सणानिमित्त शहरातील बाजारपेठांमध्ये दिवसभर गर्दीचे वातावरण होते. नागरिकांनी खरेदीसाठी मोठी उपस्थिती लावली होती. अनेक ठिकाणी समाजबांधवांनी एकत्र येत सामाजिक ऐक्य आणि बंधुभावाचे दर्शन घडविले. बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जाफ्राबाद पोलीस प्रशासनाने चोख सुरक्षा व्यवस्था ठेवली होती. ईदगाह परिसर, प्रमुख चौक, मशिदी आणि गर्दीच्या ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. यावेळी पोलीस निरीक्षक सतीश जाधव, पोलीस उपनिरीक्षक देव पवार, पोलीस उपनिरीक्षक राजधर पठाडे, महेश वैद्य, पी.सी. जायभाय, पी.सी. दूरे, डोईफोडे व इतर पोलीस कर्मचारी सतत गस्त घालत परिस्थितीवर लक्ष ठेवून होते. पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तसेच नागरिकांच्या सहकार्यामुळे बकरी ईदचा सण शांततेत, आनंदी वातावरणात आणि उत्साहात पार पडला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 7 0
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे