सामाजिक ऐक्याचा जागर : सावता महासंघाचा ६ वा वर्धापन दिन जल्लोषात साजरा

जालना/प्रतिनिधी, दि.14
विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती; संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा डोंगरखोस यांच्या नेतृत्वाखाली संघटन, समाजहिताचा संदेश
देणाऱ्या सावता महासंघ महाराष्ट्र राज्य संघटनेचा ६ वा वर्धापन दिन रविवारी (दि. १३) मोठ्या उत्साहात व जल्लोषपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. सावता महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा डोंगरखोस यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला विविध राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच प्रशासकीय क्षेत्रातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जालना नगरीचे माजी नगराध्यक्ष तथा शिवसेना (शिंदे गट) प्रमुख आणि परभणी जिल्हा संपर्कप्रमुख भास्करराव आंबेकर साहेब होते. यावेळी बहुजन वंचित आघाडीचे जिल्हाध्यक्ष रामप्रसाद थोरात, राष्ट्रीय काँग्रेस कमिटीचे जालना शहराध्यक्ष डॉ. विशाल धानुरे, माजी जिल्हा परिषद सभापती देवनाथ जी जाधव जिल्हा परिषद सदस्य बबनराव खरात, माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव खलसे, नगरसेवक दिनेश दैने,माळी महासंघाचे सचिव संतोष जमदाडे सावता महासंघ राज्य उपाध्यक्ष श्री विलास सत्वधर समता परिषद चे अध्यक्ष दीपक भाऊ वैद्य पंचायत समिती सदस्य सर्जेराव शेवाळे यांची प्रमुख उपस्थिती होती.तसेच महात्मा फुले विचार मंचाचे प्रा. बुलबुले, एकनाथ गायकवाड, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष ज्ञानेश्वर धानुरे, सामाजिक कार्यकर्ते राधाकिसन माने इंदरराव जाधव शिक्षक परिषद जिल्हा अध्यक्ष श्री मंगेश जवळ शिक्षक संघ जिल्हाध्यक्ष श्री शांतीलाल गोरे कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे जालना जिल्हा सचिव शिवानंद खरात सर, देव मूर्ती मा सरपंच गणेश तिडके गवळी पोखरी मा सरपंच गणेश वाघमारे पाथरूडचे सरपंच धनंजय गायके अखिल भारतीय माळी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमाकांत वाघमारे, ग्रामसेवक संघटनेचे शिवानंद केळकर, सामाजिक कार्यकर्ते सुभाष गिराम योगेश भैय्या जाधव संदीप मगर विलास खैरे एडवोकेट अशोक खरात वाघरूळ श्री मिलिंद काळे राणी उंचेगावचे सरपंच विठ्ठलराव खैरे ज्ञानेश्वर वाघमारे सर श्री बालाजी ठाकरे मस्के सर मुळे सर मंडळ अधिकारी श्री खांडेभराड ,.जनार्धन गिराम .रमेश गिराम यांची प्रमुख उपस्थिती होती
यावेळी मान्यवरांनी संत सावता महाराजांच्या विचारांचा वारसा पुढे नेत समाजामध्ये एकोपा, बंधुभाव, शिक्षण, संघटन आणि सामाजिक प्रगतीसाठी सर्वांनी एकत्रितपणे कार्य करण्याचे आवाहन केले. संस्थापक अध्यक्ष संतोष अण्णा डोंगरखोस यांच्या मार्गदर्शनाखाली सावता महासंघाच्या माध्यमातून समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याचे तसेच सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्याचे कार्य सुरू असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. संत सावता महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला आणि सावता महासंघाचा ६ वा वर्धापन दिन अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
सदरील कार्यक्रमासाठी तुकाराम गोरे राजू फुलझाडे परमेश्वर हजारे, श्री चिंचाणे ज्ञानेश्वर धानोरे दत्ता खलसे विलास सत्वधर बाळू हरकळ संतोष घोलप निवृत्ती गोरे भीमराव गिराम सुनील दाजी खेत्रे रोहित खलसे भगवनराव खराडे रामराव खराडे बाबासाहेब घायाळ किशोर खराडे हरीश खराडे सचिन खराडे बाळासाहेब खराडे रितेश खराडे सोनाजी घडलिंग नंदू घडलिंग सचिन राऊत सचिन गाडेकर गौरव खराडे यांनी मेहनत घेतली..
सदरील कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री मुक्ताराम खरात सर व आभार प्रदर्शन श्री तुकारामजी गोरे यांनी केले.
सदरील कार्यक्रमास सावता महासंघ राज्य विभागीय जिल्हा तालुका पदाधिकारी यांची राज्यभरातून मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थिती होती…
माहिती स्त्रोत -सावता महासंघ जनसंपर्क कार्यालय महाराष्ट्र राज्य
(8080249099)



