pub-7425537887339079
ब्रेकिंग

अधिक मास हा आध्यात्मिक शुद्धीकरणाचा काळ — हरिभक्त परायण विठ्ठल महाराज

0 4 2 6 3 4
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.11

ज्येष्ठ अधिक मास हा आध्यात्मिक शुद्धीकरणाचा काळ आहे. अधिक मास भक्ती, आध्यात्मिक साधना आणि दानधर्मासाठी अत्यंत शुभ मानला जातो. मात्र या काळात शुभ कार्ये करण्यास मनाई आहे.

अधिक मास हा आध्यात्मिक शुद्धीकरणाचा महिना

जप, तप, दानधर्मासाठी अत्यंत शुभ काळ

शुभ कार्ये करण्यास मनाई

यावर्षी अधिक मासाचा विशेष योग जुळला असून हा महिना धार्मिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा आहे. या महिन्यात केलेल्या कर्मांचे फळ अनेक पटींनी वाढते. हिंदू पंचांगानुसार जेव्हा एकच चंद्र मास दोनदा येतो तेव्हा पहिल्याला अधिक मास आणि दुसऱ्याला शुद्ध मास म्हणतात. चंद्र आणि सौर वर्षांमध्ये संतुलन राखण्यासाठी अधिक मास दर तीन वर्षांनी एकदा येत असते.

या महिन्याला मलमास किंवा पुरुषोत्तम मास म्हणूनही ओळखला जातो. हा महिना भगवान विष्णूला समर्पित आहे. नकारात्मकतेला तुमच्या जीवनावर प्रभाव टाकण्यापासून रोखण्यासाठी या महिन्यात काही नियमांचे पालन केले गेले पाहिजे.

अधिक मास कधी सुरू होईल?

हा विशेष महिना रविवार १७ मे २०२६ रोजी सुरू होईल आणि सोमवार, १५ जून २०२६ पर्यंत चालेल. यानंतर शुद्ध ज्येष्ठ महिना सुरू होईल. हा महिना १३ जुलै २०२६ पर्यंत असने. हा काळ धार्मिक कार्यांसाठी अत्यंत फलदायी मानला जातात
अधिक मासात काय करावे?
या पवित्र महिन्यात भगवान विष्णूच्या उपासनेला विशेष महत्त्व आहे.

‘ओम नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप केल्याने मानसिक शांती आणि पुण्य लाभ मिळते.

दानधर्मात तुम्ही वस्त्र आणि दीपदान करणे अत्यंत शुभ मानले जाते.

श्रीमद् भागवत कथा आणि गीतेचे पठण केल्याने आध्यात्मिक प्रगती होते.

पवित्र नद्यांमध्ये स्नान करणे किंवा घरी गंगाजलाने स्नान करणे देखील लाभदायक मानले जाते.

या काळात सद्गुणी जीवन आणि आध्यात्मिक साधना केल्याने आध्यात्मिक शुद्धीकरण होते.

अधिक मासात काय करू नये?
अधिक मासात विवाह, साखरपुडा, मुंडन विधी, जानवे घालणे किंवा गृहप्रवेश यांसारखे कोणतेही शुभ कार्य करू नये.

या काळात नवीन व्यवसाय सुरू करणे किंवा नवीन नोकरी जॉईन करण्यासह हा महिना उचित मानला जात नाही.

मालमत्ता, वाहने किंवा घरांसंबंधी नवीन खरेदी देखील टाळावी.

मांस, मद्य, लसूण आणि कांदा यांसारख्या तामसिक पदार्थांचे सेवन करण्यास मनाई आहे.

या काळात उपवास सुरू किंवा समाप्त करू नये. तसेच खोटे बोलणे, वाद घालणे आणि इतरांचा अपमान करणे टाळणे महत्त्वाचे आहे, कारण यामुळे आपलं नाते खराब होऊ शकते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 6 3 4
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे