pub-7425537887339079
ब्रेकिंग

दिनकररावजी देशमुख साहेब यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त टेंभुर्णीत भव्य आंतरशालेय कबड्डी स्पर्धाचे आयोजन

0 5 3 2 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.19

दिनकररावजी मारोतराव देशमुख यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त कै. मारोतराव देशमुख माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, टेंभुर्णी येथे शनिवार, दि. १९ सप्टेंबर २०२६ रोजी भव्य आंतरशालेय कबड्डी स्पर्धेचे आयोजन विद्यालयाच्या क्रीडांगणावर करण्यात आले.

या स्पर्धेत श्रीमती जे.बी.के. विद्यालय, टेंभुर्णी, सेठ ई.बी.के. विद्यालय, टेंभुर्णी, जिजामाता विद्यालय, निमखेडा, जाणता राजा श्री छत्रपती विद्यालय, अकोलादेव, छगनरावजी भुजबळ विद्यालय, आसई, स्व. भास्कररावजी शिंगणे विद्यालय, पापळ तसेच लुंबिनी विद्यालय, कुंभारझरी इत्यादी शाळेच्या संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.

स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी अहिल्यादेवी शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव माननीय प्रा. डॉ. श्री. नंदकुमार माळशिखरे सर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जनजागृती शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष माननीय श्री.भगवान काका देशमुख होते. तसेच सचिव श्री. संदीप दिनकरराव देशमुख यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

यावेळी विविध सहभागी शाळांचे शिक्षक व क्रीडा शिक्षकही उपस्थित होते. श्रीमती जे.बी.के. विद्यालयाचे क्रीडाशिक्षक राजेश शेवाळे सर, जिजामाता विद्यालयाचे सुधीर भोपळे सर, सेठ ई.बी.के. विद्यालयाचे देशमुख सर, छगनरावजी भुजबळ विद्यालयाचे अनिल गाढवे सर तसेच विनोद देवरे यांची उपस्थिती होती.

स्पर्धेतील 14 वयोगटातील विजेता संघ कै मारोतराव देशमुख विद्यालय टेंभुर्णी उपविजेता जे.बी.के विद्यालय टेंभुर्णी व संघ 17 वयोगटामध्ये विजेता संघ म्हणून जे.बी.के विद्यालय टेंभुर्णी व उपविजेता संघ जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी विद्यालय अकोला देव व तृतीय विजेता म्हणून कै. मारोतराव देशमुख विद्यालय टेंभुर्णी

या स्पर्धेत पंच म्हणून सोमेश माघाडे, ओम उखर्डे, राजू दांडगे, विशाल शेळके आणि अमोल राठोड यांनी पंच म्हणून काम पाहिले.

या भव्य क्रीडा स्पर्धेच्या आयोजनासाठी विद्यालयाचे क्रीडाशिक्षक मोहन मुनेमाणिक सर यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षक तसेच शिक्षकेतर कर्मचारीवृंदाने मोलाचे सहकार्य केले

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 2 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे