pub-7425537887339079
ब्रेकिंग

आरोग्याच्या निर्देशांकामध्ये सुधारणा करा अन्यथा कार्यवाहीला सामोरं जा– -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

0 4 6 1 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.14

जिल्हास्तरीय कृतीदल समितीची सभा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. नियमित लसीकरण, गोवर रुबेला निर्मुलन, राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन कार्यक्रम (एनक्युएएस), एच.पी.व्ही. लसीकरण, इत्यादी बाबत आढावा घेतांना काही निर्देशांकामध्ये काम कमी असल्याचे निदर्शनास आले तेव्हा जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांनी स्पष्ट निर्देश दिले की, आरोग्याच्या निर्देशांकामध्ये सुधारणा, गुणात्मक काम करा अन्यथा सक्त कार्यवाही करण्यात येईल. एच.पी.व्ही. लसीकरण जिल्ह्यात अत्यंत कमी असुन ते वाढविण्याचे निर्देश मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद डॉ. कृष्णकांत कनवारिया यांनी सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकिय अधिक्षक यांना दिले. एच.पी.व्ही. लसीकरण वाढविण्यासाठी शाळांना भेटी देवुन पालकांचे समुपदेशन करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. राष्ट्रीय कुष्ठरोग नियंत्रण कार्यक्रमाचा संपुर्ण आढावा व मार्गदर्शन सहाय्यक संचालक, आ.से. कुष्ठरोग डॉ. सुधाकर शेळके यांनी घेतला. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयश्री भुसारे यांनी पल्स पोलिओ, एच.पी.व्ही. लसीकरण, गोवर व रुबेला दुरीकरण मोहिम विषयी माहिती दिली. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र पाटील यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा आढावा घेऊन सांगितले की, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी महात्मा फुले जन आरोग्य योजनांचा लाभ रुग्णांना द्यावा. तसेच त्यांनी जन्म व मृत्यूचा आढावाही घेतला. रुग्णांना चांगली आरोग्य सेवा देवुन रेफर करणे शक्यतो टाळावे. आपल्या आरोग्य संस्था नियमित स्वच्छ असाव्यात. तालुका आरोग्य अधिकारी यांनी आपल्या पी.एच.सी.ला नियमित भेटी देऊन सर्व आरोग्य उपक्रमांचा आढावा घेऊन स्वच्छता पाहणी करण्याचे सांगितले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी, डॉ. जयश्री भुसारे जिल्हा शल्य चिकीत्सक, डॉ. राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी विनय पवार, कौशल पाटील, प्रगती इंगवले, लायन्स क्लबचे डॉ. गिरीश पाकणीकर, आरोग्य अधिकारी डॉ. एस. झेड गवारे व कर्मचारी उपस्थित होते. डॉ. जगदीश बनसोडे, डॉ. श्रीकांत देसाई डॉ. एन.जी.पवार, वैद्यकिय अधिक्षक, तालुका अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे