pub-7425537887339079
ब्रेकिंग

जागतिक कामगार दिना निमित्त राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांनी केले नेपाळ मधील कामगारांना मार्गदर्शन.

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.2

१ मे जागतिक कामगार दिना निमित्ताने नेपाळ ट्रेड युनियन कॉंग्रेस कडून राष्ट्रीय परीषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेला आय टी एफ चे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर तथा इंटकचे राष्ट्रीय सविक राष्ट्रीय कामगार नेते महेंद्रशेठ घरत यांना प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करण्यात आले होते. आपल्या मार्गदर्शन पर भाषणात महेंद्र घरत यांनी केंद्र सरकारच्या कामगार विरोधी धोरणांचा कडाडून विरोध केला व आम्ही सर्व नेते कामगारांच्या न्याय हक्कासाठी सदैव लढत राहू असे कामगारांना आश्वाशित केले. या परिषदेसाठी आय टी एफ लंडनचे जनरल सेक्रेटरी स्टीफन कॉटन, एसीया पॅसिफिक रिजनल सेक्रेटरी अब्दुल गनी सारंग, नेपाल कॉंग्रेस अध्यक्ष गगन थापा, कॉंग्रेस जेष्ठ नेते शेखरजी कोईराला, नेपाळ ट्रेड युनियनचे अध्यक्ष योगेंद्र कुमार, नेपाळ ट्रेड युनियन तथा आय टी एफ चे एक्झिक्युटिव्ह बोर्ड मेंबर अजयकुमार राय आदी उपस्थित होते, या परीषदेनंतर महेंद्रशेठ घरत यांनी नेपाळचे अध्यक्ष रामचंद्र पौडेलजी यांची भेट घेतली. नेपाळ ट्रेड युनियन कॉंग्रेस तर्फे परीषदेचे अतिशय चांगले नियोजन करण्यात आले होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे