pub-7425537887339079
ब्रेकिंग

त्रिमूर्ती विद्यालयात शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

0 4 7 3 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

छ. संभाजीनगर/प्रतिनिधी,दि 30

त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान संचलित त्रिमूर्ती प्राथमिक विद्यालय व श्री दादासाहेब हरिभाऊ घाडगे पाटील विद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने 26 एप्रिल 2026 रोजी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार समारंभ नुकताच उत्साहात पार पडला.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी त्रिमूर्ती पावन प्रतिष्ठान या संस्थेच्या उपाध्यक्षा अॅड. स्नेहल चव्हाण पाटील होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा संगम केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. रवींद्र कडू पाटील व मुकिंदपुर ग्रामपंचायतीचे माजी सरपंच श्री. अरुण पाटील निपुंगे उपस्थित होते.

प्रास्ताविकात प्राचार्य सोपान काळे यांनी शिष्यवृत्ती परीक्षेच्या महत्त्वावर प्रकाश टाकला. यावेळी विभाग प्रमुख नामदेव ताके, मिलिंद सोनवणे, अंजली होन, निवासी प्राचार्य एकनाथ कापसे तसेच पालक प्रतिनिधी रामदास बानकर व जेजुरकर व्यासपीठावर उपस्थित होते.

यशस्वी विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते रायटिंग बोर्ड व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. त्याचबरोबर या यशस्वी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक शिक्षक अर्जुन भांड, सुचिता जाधव, प्रियांजली कराड, दत्तू गर्जे, लहू गिरी, सन्मानित करण्यात आले श्री. रवींद्र कडू पाटील यांनी विद्यार्थ्यांना अभ्यासाबरोबरच संस्कारांचे महत्त्व पटवून दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा लक्ष्मण दळे यांनी केले. आभार विभाग प्रमुख नामदेव ताके यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 3 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे