pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालना शहरात दोन दिवस अहिल्यादेवी होळकर बहुजन व्याख्यानमाला! गुरुवारी ना.राम शिंदे ,खा.रामराव वडकुते यांची राहणार उपस्थिती

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त प्रतीवर्षाप्रमाणे सुरू असलेली पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुजन व्याख्यानमाला यंदाही आयोजित करण्यात आली असून गुरुवारी ( ता. 04) सायं. 06.30़ वा. टाऊन हॉल स्थित डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात विधान परिषदेचे सभापती ना.राम शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली व्याख्यानमालेचे उद्दघाटन होणार असल्याची माहिती व्याख्यानमालेचे अध्यक्ष पंडितराव तडेगांवकर ,सचिव सुनंदा बनसोडे यांनी दिली. व्याख्यानमालेचे यंदा 12 वे वर्षे असून जयंतीनिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. गुरुवारी होणाऱ्या उद्दघाटन सोहळ्यात अध्यक्षस्थानी ना.राम शिंदे हे ” मी कसा घडलो” या विषयावर मार्गदर्शन करतील.याप्रसंगी खा.रामराव वडकुते, आरक्षण यौध्दा दीपक बोऱ्हाडे यांचा विशेष सत्कार केला जाणार असून महापौर वंदनाताई मगरे ,उपमहापौर राजेश राऊत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.यावेळी होळकरशाही चे अभ्यासक , संशोधक राम लांडे लिखित ” लाईफ ॲन्ड लाईफ्स ऑफ पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर” या पुस्तकाचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन होईल. शुक्रवारी ( ता. 05) आ.अर्जुनराव खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली दुसऱ्या पुष्पात अहिल्यानगर येथील ज्येष्ठ लेखक, विचारवंत लहुजी कानडे हे ” अहिल्यादेवी होळकर यांचे महिला विषयक धोरण व महिला आरक्षण कायदा निर्मिती ससद्यस्थितीतील यश अपयश “या विषयावर मार्गदर्शन करतील. याप्रसंगी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष कल्याण दळे, रिपब्लिकन सेनेचे प्रदेशाध्यक्ष डॉ. सुशील सूर्यवंशी, लातूरच्या जि. प .सदस्य शितल खोमणे यांचा विशेष सत्कार केला जाणार आहे .प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक नारायण दादा चाळगे हे राहतील. तरी अहिल्यादेवी होळकर प्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून व्याख्यानांचा लाभ घ्यावा असे आवाहन व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष पंडितराव तडेगांवकर ,सचिव सुनंदा बनसोडे, उपाध्यक्ष सुरेखा गाडेकर ,कोषाध्यक्ष तुकाराम कोल्हे, सहसचिव सरिता तरवटे ,सदस्य संतोष लव्हटे, सौरभ भिसे यांच्यासह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

—————————————————————–

आज अभिवादन सोहळा..! पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त व्याख्यानमाला समितीच्या वतीने रविवारी ( ता.31) सकाळी 09.30 वा. अंबड चौफुली जवळील नियोजित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाजवळ अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन समितीचे अध्यक्ष पंडितराव तडेगांवकर, सचिव सुनंदा बनसोडे, उपाध्यक्ष सुरेखा गाडेकर, कोषाध्यक्ष तुकाराम कोल्हे, सहसचिव सरिता तरवटे ,सदस्य संतोष लव्हटे ,सौरभ भिसे यांच्यासह समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे