pub-7425537887339079
ब्रेकिंग

पुण्यातील ४ वर्षीय चिमुकलीवरील अमानुष अत्याचार-हत्या प्रकरणी पत्रकार उत्कर्ष समितीची नराधमास फाशीच्या शिक्षेची मागणी…

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.8

पुणे शहरात ६४ वर्षीय वृद्ध नराधमाने केवळ ४ वर्षांच्या निरागस मुलीवर अमानुष बलात्कार करून तिची निर्घृण हत्या केल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. या अमानवीय, क्रूर व माणुसकीला काळिमा फासणाऱ्या घटनेच्या निषेधार्थ उरण तालुक्यातील सुजाण नागरिकांच्या वतीने ‘पत्रकार उत्कर्ष समिती’ मार्फत उरणचे तहसीलदार डॉ. उद्धव कदम यांना निवेदन देण्यात आले. सदर नराधम आरोपीचा खटला ‘फास्ट ट्रॅक न्यायालयात’ चालवून ६ महिन्यांत निकाल लावत फाशीची शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. निवेदनात म्हटले आहे की, ४ वर्षांची चिमुकली, जिचे जग पाहणेही सुरू झाले नव्हते, तिच्यावर अशा पद्धतीने अत्याचार करून तिचे जीवन संपवणारा नराधम माणूस म्हणवून घेण्याच्या लायकीचा नाही. अशा विकृत प्रवृत्तीला समाजात राहण्याचा कोणताही अधिकार नाही. या घटनेमुळे मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून पालकांच्या मनात प्रचंड भीती व संतापाची लाट उसळली आहे. आरोपीला फाशी झाली नाही तर समाजात चुकीचा संदेश जाईल व अशा प्रवृत्तींना प्रोत्साहन मिळेल. त्यामुळे या प्रकरणी तात्काळ व कठोर कारवाई होणे अत्यंत आवश्यक आहे,” असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उरणच्या तहसीलदारांनी या निवेदनाची गंभीर दखल घेऊन ते मा. जिल्हाधिकारी, रायगड व मा. गृह विभाग, महाराष्ट्र शासन यांच्याकडे तात्काळ पाठवून योग्य कार्यवाही करावी, अशी मागणी ‘पत्रकार उत्कर्ष समिती’च्या वतीने पूजा चव्हाण यांनी केली आहे. या घटनेमुळे उरण तालुक्यातही संतापाची लाट पसरली असून, “जग पाहण्याआधीच चिमुकलीचा बळी घेणाऱ्या नराधमाला फाशीशिवाय दुसरी शिक्षा नकोच,” अशी एकमुखी मागणी नागरिकांमधून होत आहे. निवेदनातील प्रमुख मागण्या : १. सदर खटला ‘फास्ट ट्रॅक न्यायालयात’ चालवून ६ महिन्यांच्या आत निकाल लावण्यात यावा. २. आरोपीला भारतीय न्याय संहिता व बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (POCSO) अंतर्गत कठोरात कठोर, म्हणजेच फाशीची शिक्षा व्हावी यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील नेमावा. ३. पीडित कुटुंबाला तात्काळ आर्थिक व मानसिक मदत शासनामार्फत देण्यात यावी. ४. भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शाळा, अंगणवाडी व सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही व पोलीस गस्त वाढवण्यात यावी.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे