pub-7425537887339079
ब्रेकिंग

सिध्दार्थ महाविद्याल‌यामध्ये 13 जुलै 2026 रोजी क्रीडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन….

0 4 8 2 6 7
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.10

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे-१ व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने सिध्दार्थ महाविद्यालय जाफराबाद येथे १३ जुलै रोजी ठिक ११=00 वाजता क्रीडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. शालेय क्रीडा स्पर्धा 2026-2027 या शैक्षणीक वर्षाचे वेळापत्रक (आराखडा) तयार करण्यात येणार आहे. या बैठकीस महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सविता सिनगारे, सन्माननीय सचिव डॉ. राहुलजी म्हस्के, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र पवार यांच्या अधिपत्याखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आलेले आहे. या बैठकीस प्रमुख उपस्थीती मध्ये उप-प्राचार्य प्रो.डॉ. सुनील मेढे, उप-प्राचार्य डॉ.शाम सर्जे, उप-प्राचार्य विनोद हिवराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता लोंढे, उदय बोडखे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिध्दार्थ कदम, आरती चिल्लारे, आशिश जोगदंड, तालुका संयोजक श्री. एकनाथ सुरुशे, प्रा. उदय वझरकर, प्रा. वाहेद पटेल, प्रा. शिवाजी वैद्य, आत्माराम मरकड, गणेश भोपळे, मुख्याध्यापक रमेश मुरकुटे, आकाश छडीदार व जाफ्राबाद तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षकांच्या उपस्थीतीत क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक तयार होणार आहे. या बैठकीस जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेन्द्र पवार मार्गदर्शन करणार आहेत. क्रीडा स्पर्धा सुयोग्य आणि शिस्तबद्ध आयोजनासाठी व प्रभावी नियोजन यजमान संस्थांची व शाळेची निवड, पंच नियुक्ती, स्पर्धेचे अचुक वेळापत्रक निश्चित करणे, आवश्यक क्रीडा सुविधांची उपलब्धता तपासणे अणि विविध क्रीडा स्पर्धेच्या समित्यांची स्थापना करणे. यांसारख्या अत्यंत महत्वाच्या आणि तांत्रिक बाबीवर व खेळाडूचे ऑनलाईन प्रवेश फॉर्म व खेळाडू या शाळेतून त्या शाळेत प्रमोट करने, ग्रेस गुण, नवीन खेळाची नियमावली, व क्रीडा शिक्षकांच्या समस्या या वर सविस्तर चर्चा होणार आहेत. तरी सर्व जाफ्राबाद तालुक्यातील प्राचार्या व मुख्याध्यापक यांनी आपाआपल्या शाळेमधील क्रीडा शिक्षकांना क्रीडा स्पर्धेचे आयोजन व नियोजनासाठी उपस्थीत राहावे असे आव्हान जिल्हा क्रीडा अधिकारी श्री. नरेंद्र पवार यांनी केले आहेत.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 6 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे