pub-7425537887339079
ब्रेकिंग

माझं गाव आरोग्य संपन्न गाव अभियानांतर्गत सक्रिय सहभाग घ्यावा – राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी अमोल पाटील

0 4 7 6 4 2
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.6

‘माझं गाव आरोग्य संपन्न’ अभियान अंतर्गत राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी अमोल पाटील यांनी भोकरदन तालूक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र नळणी बुद्रुक अंतर्गत राजूर येथे आयोजित असंसर्गजन्य रोग निदान शिबिर शिबिराला भेट दिली. यावेळी नागरिकांना प्रत्यक्ष भेटून ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ अभियानाची माहिती देऊन या अभियानात सक्रिय सहभाग घेऊन आपले आरोग्य संपन्न होईल याची दक्षता घेण्याचे आव्हान केले.
या शिबिरामध्ये 30 वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या एकूण 75 नागरिकांची मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये 60 नागरिकांची रक्त तपासणी आणि 45 नागरिकांचा ईसीजी (ECG) करून आवश्यक वैद्यकीय उपचार व सल्ला, मार्गदर्शन, पोषण आहार व प्रतिबंधात्मक उपाययोजना बाबत माहिती देण्यात आली.
या शिबिरास प्रमुख अतिथी म्हणून राज्यस्तरीय समन्वयक अधिकारी अमोल पाटील, डी. एस. बोराडे, ऋतुजा पाटील, सुनील बोडखे, यांची उपस्थिती होती. तसेच ग्रामसेवक पुंगळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सुमित सावंत, डॉ. दीपक निहाल आणि प्राथमिक आरोग्य केंद्र नळणी येथील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांचे महत्त्वपूर्ण योगदान व उपस्थिती होती. ग्रामीण भागातील नागरिकांना गावातच आरोग्य सुविधा मिळाव्यात या उद्देशाने आयोजित केलेल्या शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

-*-*-*-*-*-

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 6 4 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे