pub-7425537887339079
ब्रेकिंग

जालन्यात बालरंगभूमी परिषदेतर्फे ‘जल्लोष लोककलेचा महोत्सव २०२६’

बालकलावंतांसाठी विविध लोककला स्पर्धांचे आयोजन; २३ सप्टेंबरपर्यंत प्रवेश अर्ज करण्याचे आवाहन

0 5 3 2 4 5
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.18

बालरंगभूमी परिषद, जालना जिल्हा शाखेच्या वतीने बालकलावंतांसाठी *‘जल्लोष लोककलेचा महोत्सव २०२६’* या भव्य लोककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाची प्राथमिक फेरी *रविवार, दि. २७ सप्टेंबर २०२६ रोजी जालना येथे* आयोजित करण्यात आली आहे.

बालरंगभूमी परिषद मध्यवर्ती, मुंबईच्या अध्यक्षा *नीलम ताई शिर्के (सामंत)* यांच्या मार्गदर्शनाखाली या भव्य लोककला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे हे तिसरे वर्ष असून, बालकलावंतांना आपल्या कलागुणांना वाव मिळावा तसेच त्यांच्यामध्ये लोककलेविषयी आवड निर्माण व्हावी, या उद्देशाने विविध लोककला स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. विजेत्या स्पर्धकांसाठी आकर्षक पारितोषिकेही ठेवण्यात आली आहेत, अशी माहिती बालरंगभूमी परिषद, जालना जिल्हा शाखेच्या अध्यक्षा *वैशाली शालिग्राम दाभाडे* यांनी दिली.

या महोत्सवामध्ये *एकल नृत्य, एकल गायन, एकल वाद्य, समूह नृत्य आणि समूह गीत* या लोककला प्रकारांचा समावेश आहे.

या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीसाठी जालना जिल्ह्यातील विविध तालुक्यांमधील शाळा व संस्थांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. इच्छुक शाळा व संस्थांनी *दि. २३ सप्टेंबर २०२६ पर्यंत प्रवेश अर्ज भरून आपला सहभाग नोंदवावा.*

*बालकलावंतांसाठी लोककला प्रशिक्षण शिबिर*

जल्लोष लोककलेचा महोत्सव २०२६’च्या पूर्वतयारीचा भाग म्हणून जालना जिल्ह्यातील बालकलावंतांसाठी लोककला प्रशिक्षण शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. जालना शहरासह विविध तालुक्यांच्या ठिकाणी ही प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली जाणार असून, शिबिराचे स्थळ व दिनांक यासाठी खालील दिलेला दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा .

या प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून बालकलावंतांना लोककलेच्या विविध प्रकारांचे मार्गदर्शन तसेच स्पर्धेसाठी आवश्यक प्रशिक्षण मिळणार आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 2 4 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे