मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त भाजपा जालना महानगरची नियोजन बैठक संपन्न
मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचवा-डॉ. भागवत कराड मोदी सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय व्हावे-भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

जालना/प्रतिनिधी,दि.6
केंद्रातील मोदी सरकारच्या यशस्वी १२ वर्षांच्या कार्यकाळानिमित्त “विश्वास, विकास व जनकल्याण” या अभियानांतर्गत भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्याच्या वतीने जिल्हा नियोजन बैठकीचे आयोजन भाजपा जिल्हा कार्यालय, जालना येथे करण्यात आले. या बैठकीत आगामी काळात राबविण्यात येणाऱ्या विविध जनसंपर्क कार्यक्रमांचे नियोजन करण्यात आले. या बैठकीस प्रदेश संयोजक डॉ. भागवत कराड, मराठवाडा विभाग संयोजक नितीन काळे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी डॉ.भागवत कराड यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या गेल्या १२ वर्षांतील विविध विकासकामांचा आढावा घेतला. पायाभूत सुविधा, गरीब कल्याण, महिला सक्षमीकरण, शेतकरी हित, सामाजिक न्याय तसेच देशाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. तसेच केंद्र सरकारच्या जनकल्याणकारी योजनांचा लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी अधिक प्रभावीपणे काम करावे असे हि त्यांनी सांगितले. यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी सांगितले की, मोदी सरकारच्या १२ वर्षांच्या यशस्वी कार्यकाळानिमित्त जालना महानगर जिल्ह्यात विविध जनसंपर्क कार्यक्रम, सामाजिक उपक्रम तसेच मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण अभियान राबविण्यात येणार आहे. केंद्र सरकारच्या विकासकामांची व जनकल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते सक्रियपणे सहभागी होतील, असेही त्यांनी सांगितले. यावेळी महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, रामेश्वर भांदरगे, विजय कामड, सोपान पेंढारकर, युवानेते अक्षय गोरंटयाल, नारायण पवार, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, वसंत शिंदे, शिवप्रकाश चितळकर, मंडळ अध्यक्ष सुनील खरे, संजय डोंगरे, रमेश गौरक्षक, नगरसेविका संध्या देठे, सखुबाई पणबिसरे, रिमा खरात, संतोष माधवले, कल्याण भदनेकर, शिवराज नारियलवाले, अनिल सरकटे, सतीश केळकर, सुभाष सले, सिद्धेश्वर हाजबे, दुर्गेश कुरील, सुमित सुरडकर, राजाराम जाधव, रोषण चौधरी, सोमेश काबलिये, विकास कदम, रोहित भूरेवाल, मनोजकुमार जोशी, विष्णू डोंगरे, संजय भगत, करण निकाळजे, कैलास सोळुंके, दत्ता जाधव, मुकेश चव्हाण, गुलाब पणबिसरे, सुदर्शन काळे, गणेश जल्लेवार, रोहित खोडवे, नानासाहेब देव्हडे, गौरव गोधेकर, उमेश पेंढारकर आदींची उपस्थिती होती. बैठकीनंतर “एक झाड आईच्या नावाने” या अभियानांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी वृक्षारोपणात सहभाग नोंदविला. बाबासाहेब पाटील कोलते प्रसिद्धीप्रमुख, भाजपा जि.जालना ९८६०७०७५००

