pub-7425537887339079
ब्रेकिंग

महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यां सोबत साधला राजू मुंबईकर यांनी मुक्त संवाद !

0 4 8 0 9 5
[sp_wpcarousel id="1375"]
उरण/विठ्ठल ममताबादे,दि.18
हिंदू संस्कृतीतील साजरा केला जाणारा पारंपरिक म्हणजे  नागपंचमी हा सण श्रावण महिन्यात येणारा पहीला सण आहे ह्याच दिवशी भगवान श्रीकृष्णाने कालियामर्दन केले असे मानले जाते.याच नागपंचमी सणाचे औचित्य साधून महात्मा फुले कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय पनवेल येथे वन्यजीवप्रेमी आणि केअर ऑफ नेचर सामाजिक संस्थेचे संस्थापक महाराष्ट्र भूषण राजू मुंबईकर यांच्या माध्यामातून  आयोजित प्रबोधनात्मक व्याख्यानमालेत खास करून युवा तरुणांमध्ये निसर्गाप्रती आत्मियता निर्माण व्हावी याच उदात्त भावनेतून महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांना निसर्गातील जीवजंतू, प्राणी – पक्षांविषयी खास करून सापांबद्दल उपयुक्त माहिती देण्यासाठी व्याखनरुपी मार्गदर्शनपर  प्रबोधनात्मक विचारमंथनपर चर्चासत्रात अर्थात ” साप समज आणि गैरसमज “या व्याख्यान रुपी  प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करून खास करून सापांबद्दलची उपयुक्त असी माहिती देण्यात आली. या  कार्यक्रमात सहभागी विद्यार्थ्यांना महाविद्यालयाच्या मोठ्या प्रशस्त अश्या विवेकवाहिनी ऑडिटोरियम हॉलमध्ये फ्लेक्स  ( फोटोच्यां ) माध्यमातून विषारी, निमविषारी आणि बिनविषारी सापांच्या अनेक जाती पाहायला मिळाल्या… सोबतच सापांबद्दलची उपयुक्त माहितीची देवाण – घेवाण करत विद्यार्थ्यांनी विचारलेल्या अनेक प्रश्नांची अचूक आणि उपयुक्त अशी माहिती देत विद्यार्थ्यांच्या मनात सापांबद्दलची असणारी भीती आणि अनेक गैरसमज देखील दूर करण्यात आले.
       महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य या महाविद्यालयात राजू मुंबईकर यांनी घेतलेल्या प्रबोधनात्मक चर्चासत्रात सहभागी झालेले विद्यार्थी हे शहरी आणि ग्रामीण भागातून असल्यामुळे त्यांच्यात सापांबद्दलचे असणारे अनेक समज गैरसमज आणि भीती त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांनी विचारलेल्या प्रश्नातून जाणवत होती. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची समर्पक उत्तरे देऊन आणि निसर्गातील जीव – जंतू आणि प्राणी – पक्षांबद्दलची आणि खास करून सापांबद्दलची उपयुक्त अशी माहिती देऊन राजू मुंबईकर यांनी विद्यार्थ्या मध्ये सापांबद्दलचे असणारे  “समज आणि गैरसमज ” आणि अंधश्रद्धाचं निरासरण केल.
     नागपंचमी सणाचे औचित्य साधून आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांसोबत सहभागी झालेल्या महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य रायगड भूषण गणेशजी ठाकूर,सहप्राचार्य प्रफुल्लजी वशेणीकर  यांनी राजू मुंबईकर यांच्या माध्यामातून साकारलेल्या व्याख्यानरुपी प्रबोधनात्मक कार्यक्रमा द्वारे विद्यार्थ्यांना दिलेल्या सापांबद्दलच्या उपयुक्त अश्या माहितीमुळे राजू मुंबईकर यांचे भरभरून कौतुक करत आभार मानले.
 या  प्रबोधनात्मक अश्या व्याख्यान रुपी  कार्यक्रमात सहभागी झालेले महात्मा फुले कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील सर्व शिक्षक वृंद आणि विद्यार्थी वर्गाच्या उपस्थितीत हा प्रबोधनात्मक व्याख्यान पुष्प कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला.
बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 0 9 5
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे