pub-7425537887339079
ब्रेकिंग

विश्वास पात्र काम महत्त्वाचे— विधान परिषद सभापती प्रा. राम शिंदे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेत प्रतिपादन

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 6

राजकारणात मोठे होण्यासाठी, पदे मिळवण्यासाठीच अनेक जण काम करतात. अनेकदा अन्याय होतो. दुर्लक्ष होते. डावलले जाते. बाजूला सारले तरी काही मिळवणारच, ही जिद्द हवी. स्वतःला सिद्ध करताना ज्यांनी विश्वास ठेवला त्यांच्या विश्वासास पात्र राहून काम केले तर यश हमखास मिळते, असे विधान परिषदेचे सभापती ना. प्रा. राम शिंदे यांनी सांगितले.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर बहुजन व्याख्यानमालेचे उद्घाटन झाले. ‘मी कसा घडलो’ या विषयावर प्रा. राम शिंदे यांचे व्याख्यान झाले. सत्कारमूर्ती खा. रामराव वडकुते, आरक्षण योद्धा दीपक बोहाडे, आ. अर्जुन खोतकर, महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत, व्याख्यानमालेचे अध्यक्ष पंडितराव तडेगावकर, सचिव सुनंदा बनसोडे, उपाध्यक्ष उपाध्यक्ष सुरेखा गाडेकर, शांतीलाल बनसोडे, कोषाध्यक्ष तुकाराम कोल्हे, सरिता तरवटे, सौरभ भिसे, संतोष लव्हटे, हरिभाऊ शिल्लेवार यांची

सभापती प्रा. राम शिंदे यांचे स्वागत करताना खासदार रामराव वडकुते.

व्याख्यानमालेतून प्रेरणा देण्याचे काम

खा. रामराव वडकुते म्हणाले, व्याख्यानमालेतून प्रेरणा देण्याचे काम होते. संघी मिळाली तेव्हा समाजाला न्याय दिला. चार वेळा धनगर आरक्षणासाठी सभागृह बंद

पाडले. आमदार असताना पहिल्या मोर्चात सहभाग घेतला. राज्य शासनाकडून धनगर आरक्षणासाठी केंद्राकडे मसुदा पाठवावा, अशी मागणी त्यांनी केली. आपण राज्यसभेत आवाज उठवणार, अशी ग्वाही त्यांनी दिली.

उपस्थिती होती. सभापती शिंदे पुढे म्हणाले, अहिल्यादेवी होळकरांनी सती न जाता राज्यकारभार हाती घेतला. हिंदू धर्म वाचवला. माझा अशिक्षित शेतकरी कुटुंबात जन्म झाला, नऊ ठिकाणी शाळा बदलल्या. प्रत्येक ठिकाणी खेळात रुची होती. वर्गाचा मॉनिटर होतो. तोच अनुभव सभागृह चालवताना येतो. अजूनही वर्ग चांगला चालवतो, अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. चौंडी विकास प्रकल्पात लक्ष घातल्यानंतर नोटीस आली. तत्कालीन पाणीपुरवठा मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या सूचनेवरून उपप्राचार्य पदाचा राजीनामा दिला. चौंडीच्या विकासावर लक्ष केंद्रित केले. २८ वर्षांच्या लढाईला यश मिळाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संपूर्ण मंत्रिमंडळ चौंडीत आणले. बाराशे कोर्टीचा विकास आराखडा मंजूर केला. पुढील तीन वर्षांत उज्जैन, पंढरपूरच्या घर्तीवर चौंडीचा चौफेर कायापालट होईल, असा विश्वास व्यक्त केला. पहिल्या पंचायत समिती निवडणुकीतील पराभव, चौंडी गावातील सरपंचपद, बाजार समिती निवडणूक, कर्जत-जामखेड मतदारसंघात स्व. गोपीनाथराव मुंढे यांनी दिलेली उमेदवारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार वेळा प्रदेशाध्यक्ष पदासाठी सुचवलेले नाव, राज्यमंत्री व कॅबिनेट मंत्रिपदाच्या जबाबदाऱ्या, सामान्य कार्यकर्त्याला

पाडण्यासाठी मोठ्या माणसांनी लावलेली शक्ती, याबाबत त्यांनी माहिती दिली. वरिष्ठ सभागृहात पीठासीन अधिकारी म्हणून संधी मिळाली, आरक्षणाचा प्रश्न जटिल आहे. तो गंभीर आहे. संविधानाच्या अधीन राहूनच तो सुटू शकतो. संघटनात्मक बांधणी हवी. संघर्षशील कार्यकत्यांनी पुढाकार घेतला स पाहिजे,’ असे शिंदे म्हणाले.

आ. अर्जुन खोतकर म्हणाले, थोर महापुरुषांचे पुतळे प्रेरणा देतात. मह अहिल्यादेवी होळकर व्याख्यानमालेतून मनात भाव उमटतात. अनेकांना अंकुर अ फुटले. शहरात सुसज्ज सभागृहासाठी क निधी द्यावा, अशी मागणी केली. वीज पक्ष गायब होताच सरकारने आदेश देऊन डॉ निष्क्रिय अधिकाऱ्यांना घरी पाठवावे, अ अशी मागणीही त्यांनी केली. दीपक जि बो-हाडे म्हणाले, महापुरुषांचा संघर्ष दान मानवजातीच्या उत्कर्षासाठी होता. आज प्रकि त्यांच्याच नावावर दंगली घडवल्या दे जातात. व्याख्यानमालेला बळकटी द्यावी. तीन महाराजा यशवंतराव होळकर, दे अहिल्यादेवी होळकरांसह देशाप्रति त्याग, बलिदान धनगर समाजाने दिले. दोन्ही मत रामांनी लढाईला बळ दिले आहे. आरक्षण लढाईत आम्ही कमी पडणार नाही, असे त्यांनी सांगितले. महापौर वंदना मगरे, उपमहापौर राजेश राऊत यांनी अहिल्यादेवी होळकर स्मारकासाठी महानगरपा कितर्फे मदत करणार असल्याचे सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे