pub-7425537887339079
ब्रेकिंग

भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून जेएनपीएची मान्यता कायम

जागतिक बँकेच्या सीपीपीआय 2025 निर्देशांकात जागतिक स्तरावर 22वे स्थान पाच वर्षांत लक्षणीय प्रगती; 2020-2025 दरम्यान सर्वाधिक सुधारणा करणाऱ्या जागतिक 20 बंदरांमध्ये जेएनपीए 14व्या स्थानावर

0 4 7 5 0 2
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.12

भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर असलेल्या जवाहरलाल नेहरू पोर्ट प्राधिकरणाने (जेएनपीए) देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून आपले स्थान कायम राखत जागतिक बँक आणि एस अँड पी ग्लोबल मार्केट इंटेलिजन्स यांनी प्रकाशित केलेल्या कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स (सीपीपीआय) २०२५ मध्ये जागतिक स्तरावर २२वा क्रमांक पटकावला आहे. सीपीपीआय 2025 अहवालानुसार, जेएनपीएने बंदराच्या एकूण कार्यकालापैकी 75% बर्थ ऑक्युपन्सी शेअर नोंदविला आहे. तसेच, स्टॅटिस्टिकल इंडेक्स मध्ये 58.9 आणि प्रशासकीय इंडेक्स मध्ये 138.0 गुण प्राप्त करत जेएनपीएने जगातील कंटेनर बंदरांमध्ये 22वा क्रमांक मिळविला आहे. अहवालात पुढे नमूद करण्यात आले आहे की, 2020 ते 2025 या कालावधीत सर्वाधिक सुधारणा नोंदविणाऱ्या जगातील अव्वल 20 बंदरांमध्ये जेएनपीएने 14वे स्थान मिळविले आहे. या कालावधीत जेएनपीएच्या क्रमवारी गुणांकनात 32 गुणांची वाढ झाली असून, 2020 मधील 66 गुणांवरून 2025 मध्ये ते 98 गुणांपर्यंत पोहोचले आहे. या लक्षणीय सुधारणेमुळे कामगिरीत सर्वाधिक प्रगती करणाऱ्या जागतिक बंदरांमध्ये जेएनपीएने 14वे स्थान पटकावले आहे. या यशाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना जेएनपीएचे अध्यक्ष श्री. गौरव दयाल, भा. प्र. से., म्हणाले, “भारतातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून जेएनपीएला पुन्हा मिळालेली मान्यता आणि सीपीपीआय 2025 मध्ये सुधारलेले जागतिक स्थान हे कार्यक्षमता विस्तार, जहाजांच्या टर्नअराउंड वेळेत सुधारणा आणि बंदराधारित लॉजिस्टिक्स अधिक सक्षम करण्यासाठी सातत्याने करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फलित आहे. हा सन्मान संपूर्ण पोर्ट समुदायासाठी अभिमानाचा विषय असला, तरी जागतिक स्तरावरील सर्वोत्तम बंदरांच्या बरोबरीने स्वतःचे सातत्याने मूल्यमापन करत कामगिरी अधिक उंचावण्याची जबाबदारीही त्यातून वाढते. या उल्लेखनीय यशासाठी मी आमचे सर्व टर्मिनल ऑपरेटर्स, शिपिंग लाईन्स, लॉजिस्टिक्स भागीदार, सीमाशुल्क विभाग, कर्मचारी आणि जेएनपीए परिसंस्थेशी निगडित सर्व भागधारकांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो.” सीपीपीआय (कंटेनर पोर्ट परफॉर्मन्स इंडेक्स) मध्ये कंटेनर बंदरांच्या कामगिरीचे मूल्यमापन बंदरात जहाजांनी घालविलेल्या प्रत्यक्ष वेळेच्या आधारे केले जाते. या मूल्यांकनात जहाजांचा माप आणि पोर्ट कॉलची वैशिष्ट्ये विचारात घेतली जातात. हे मूल्यांकन प्रामुख्याने ऑटोमॅटिक आयडेंटिफिकेशन सिस्टिम (एआयएस) आधारित पोर्ट कॉल रेकॉर्ड्सवर आधारित असून, त्यासोबत पोर्ट आणि टर्मिनल्सकडील प्रोपायटरी डेटाची जोड दिली जाते. स्टॅटिस्टिकल आणि प्रशासकीय या दोन्ही पद्धतींमधून प्राप्त झालेल्या निष्कर्षांचे एकत्रीकरण करून प्रत्येक बंदरासाठी एकच सीपीपीआय स्कोअर निश्चित केला जातो. सीपीपीआयची कार्यपद्धती जहाजांच्या टर्नअराउंड परफॉर्मन्सच्या आधारे बंदरांच्या कार्यक्षमतेचे मूल्यमापन करते. यामध्ये बंदरातील एकूण वेळेचे तीन प्रमाणित घटकांमध्ये विभाजन केले जाते – अरायव्हल टाइम, बर्थ टाइम आणि डिपार्चर टाइम. इंडेक्सची गणना प्रामुख्याने अरायव्हल टाइम आणि बर्थ टाइम यांच्या आधारे केली जाते, जे ऑपरेशनल कार्यक्षमता आणि सेवा वितरणाचे महत्त्वपूर्ण निर्देशक मानले जातात. भारतातील सर्वात मोठे कंटेनर बंदर आणि देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारे बंदर म्हणून जेएनपीए क्षमता विस्तार, ऑपरेशनल उत्कृष्टता, शाश्वत विकास आणि तंत्रज्ञानाधारित परिवर्तनाच्या बळावर आपल्या विकासाच्या वाटचालीला अधिक गती देण्यासाठी कटिबद्ध आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 7 5 0 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे