pub-7425537887339079
ब्रेकिंग

नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ आणि सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ टेंभुर्णी कडकडीत बंद शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.22

देशातील लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलणाऱ्या नीट परीक्षा पेपरफुटी प्रकरणाचा तीव्र निषेध करण्यासाठी आणि दिल्लीत आंदोलनाला बसलेले प्रख्यात शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा देण्यासाठी आज टेंभुर्णी शहर ‘कडकडीत बंद’ पाळण्यात आले . ग्रामस्थांनी आणि स्थानिक व्यापारी संघटनांनी पुकारलेल्या या ‘गाव बंद’च्या हाकेला संपूर्ण गावातून १०० टक्के उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळपासूनच टेंभुर्णीतील मुख्य बाजारपेठ, सर्व लहान-मोठी दुकाने, हॉटेल्स, चहाच्या टपऱ्या आणि व्यापाऱ्यांनी स्वतःहून बंद ठेवली. वैद्यकीय सेवा आणि औषधांची दुकाने यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता गावात सर्वत्र कडकडीत बंद पाळण्यात आला. नेहमी गजबजणाऱ्या मुख्य चौकांमध्ये आज पूर्णपणे शुकशुकाट पाहायला मिळाला.शिक्षणाचा बाजार मांडणाऱ्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा!नीट परीक्षेमधील प्रचंड गैरव्यवहार आणि पेपरफुटीमुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय झाला आहे. या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी आपल्या पदाचा तातडीने राजीनामा दिला पाहिजे, अशी आक्रमक मागणी टेंभुर्णीकरांनी केली. आहे या भ्रष्ट व्यवस्थेत तातडीने सुधारणा व्हावी, यासाठी सोनम वांगचुक दिल्लीमध्ये आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या या न्याय्य लढ्याला बळ देण्यासाठी आणि लाखो विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी टेंभुर्णीतील नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले. तहसीलदारांमार्फत सरकारला निवेदन आंदोलकांच्या वतीने सरकारला पाठवण्यासाठी एक जाहीर मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. “पेपरफुटी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कडक कारवाई व्हावी, केंद्रीय शिक्षणमंत्र्यांचा राजीनामा घेतला जावा आणि सोनम वांगचुक यांच्या मागण्यांवर सरकारने त्वरित तोडगा काढावा, अन्यथा भविष्यात हे आंदोलन अधिक तीव्र केले जाईल,” असा इशारा टेंभुर्णी ग्रामस्थांच्या वतीने या वेळी देण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे