जिद्द चिकाटी व मेहनतीच्या जोरावर ओमकार कुलकर्णी यांनी मिळवली डॉक्टर पदवी

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.25
कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालय, येथील शिक्षक सहकारी मित्र आदरणीय भीमाशंकर जवळेकर/कुलकर्णी यांचे सुपुत्र डॉ. ओमकार कुलकर्णी यांनी अत्यंत जिद्द, प्रचंड कष्ट, चिकाटी आणि अविरत मेहनतीच्या जोरावर वैद्यकीय पदवी संपादन करून उल्लेखनीय यश प्राप्त केले आहे. त्यांच्या या यशस्वी प्रवासाने केवळ त्यांच्या कुटुंबाचेच नव्हे, तर संपूर्ण विद्यालय परिवाराचेही मस्तक अभिमानाने उंचावले आहे. आजच्या स्पर्धात्मक युगात अशा प्रकारे सातत्याने परिश्रम करून यश मिळवणे ही खरोखरच प्रेरणादायी बाब आहे. या अभिमानास्पद यशाबद्दल कै. बाबुराव जाफ्राबादकर माध्यमिक विद्यालयाच्या सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ. ओमकार कुलकर्णी यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी उपस्थित सर्वांनी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आणि त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सदिच्छा व्यक्त केल्या. डॉ. ओमकार यांचे हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरेल, यात शंका नाही. यावेळी शाळेचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.




