pub-7425537887339079
ब्रेकिंग

प्रथमच राज्यसभेत प्रतिनिधित्व करणारे खासदार रामराव सखाराम वडकुते यांची गृहनिर्माण व शहरी व्यवहार विषयक संसदीय स्थायी समितीवर नियुक्ती

0 4 4 0 4 3
[sp_wpcarousel id="1375"]

अनिल वाढोणकर/ छ.संभाजीनगर,दि.4

महाराष्ट्राचे राज्यसभा खासदार श्री रामराव सखाराम वडकुते यांची संसदेतील अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या गृहनिर्माण व शहरी व्यवहार (Housing & Urban Affairs) विषयक विभाग-संबंधित संसदीय स्थायी समितीवर सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यसभेचे सभापती यांनी विविध विभाग-संबंधित संसदीय स्थायी समित्यांवरील सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या असून त्यामध्ये श्री. वडकुते यांचा समावेश करण्यात आला आहे. प्रथमच राज्यसभेवर निवडून आलेल्या खासदाराला अल्पावधीतच अशा महत्त्वपूर्ण समितीवर काम करण्याची संधी मिळणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब मानली जात आहे. भारतीय संसदीय लोकशाहीमध्ये विभाग-संबंधित संसदीय स्थायी समित्यांना अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. संसद अधिवेशनाच्या कालावधीबाहेरही विविध मंत्रालयांच्या कामकाजावर संसदीय देखरेख ठेवणे, योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेणे, अर्थसंकल्पीय तरतुदींचे परीक्षण करणे, विधेयकांचा सखोल अभ्यास करणे तसेच लोकहिताच्या विषयांवर शासनाला सूचना व शिफारशी करणे ही महत्त्वाची जबाबदारी या समित्या पार पाडतात. त्यामुळे या समित्यांवर सदस्य म्हणून नियुक्ती होणे हे कोणत्याही खासदारासाठी महत्त्वपूर्ण जबाबदारीचे आणि विश्वासाचे प्रतीक मानले जाते.गृहनिर्माण व शहरी व्यवहार विषयक संसदीय स्थायी समिती देशातील वाढते शहरीकरण, स्मार्ट सिटी अभियान, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना, शहरी पायाभूत सुविधा, सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, स्वच्छता अभियान, सांडपाणी व्यवस्थापन, कचरा प्रक्रिया, झोपडपट्टी पुनर्वसन, शाश्वत नागरी विकास आणि नागरिकांच्या जीवनमानाशी निगडित विविध विषयांचा सखोल अभ्यास करते. समितीच्या शिफारशींना केंद्र सरकारच्या धोरणात्मक निर्णय प्रक्रियेत विशेष महत्त्व प्राप्त असते. त्यामुळे देशाच्या भविष्यातील नागरी विकासाची दिशा निश्चित करण्यात या समितीची भूमिका अत्यंत महत्त्वाची मानली जाते.विशेष म्हणजे, या समितीमध्ये देशातील विविध राज्यांतील अनुभवी आणि अभ्यासू संसद सदस्यांचा समावेश करण्यात आला आहे. आसामचे माजी कॅबिनेट मंत्री आणि राज्यसभेचे सदस्य जोगेन मोहन यांच्यासारखे अनुभवी सदस्य देखील या समितीवर कार्यरत आहेत. अशा अनुभवी सदस्यांसमवेत काम करण्याची संधी मिळाल्याने खासदार रामराव वडकुते यांना राष्ट्रीय स्तरावरील धोरणात्मक विषयांचा अधिक सखोल अभ्यास करण्याची तसेच महाराष्ट्राशी संबंधित प्रश्न प्रभावीपणे मांडण्याची संधी प्राप्त होणानार

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 0 4 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे