pub-7425537887339079
ब्रेकिंग

जवाहर नवोदय विद्यालयाच्या परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

0 4 8 2 6 7
[sp_wpcarousel id="1375"]

जालना/प्रतिनिधी,दि.9

परतुर जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा, दिनांक 28 नोव्हेंबर 2026 (शनिवार) साठी अर्ज हे ऑनलाईन प‌द्धतीने भरले जात असुन जालना जिल्हयातील रहीवासी असलेल्या व इयत्ता पाचवी वर्गात सन 2026-27 मध्ये शिकत असणा-या विद्यार्थ्यांनी त्यांची नोंदणी सेवा केंद्रावरून व ईतर यंत्रणेचा वापर करून ऑनलाईन अर्ज भरावयाचा आहे सदर अर्ज भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2026 अशी आहे. तरी जवाहर नवोदय विद्यालय निवड चाचणी-2027 साठी च्छुक विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यापुर्वी पाचवीच्या वि‌द्यार्थ्यांनी स्वतःची स्वाक्षरी, वडिलांची स्वाक्षरी, वि‌द्यार्थ्यांचा फोटो, जातीचे प्रमाणपत्र व आधारकार्ड सोबत असणे आवश्यक आहे. ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठीची जाहीरात, माहीतीपत्रक, इ हे खालील दिलेल्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. फॉर्म भरण्यासाठीचे प्रमाणपत्रे, फोटो, स्वाक्ष-या इ हे 10 ते 100 KB मध्ये स्कॅन करून संकेतस्थळ “www.navodaya.gov.in”, व https://cbseitms.rcil.gov.in/nvs यावरून भरावेत. विद्यार्थ्यांचा जन्म हा दिनांक 1 मे 2015 ते 31 जुलै 2017 च्या दरम्यानचा असावा.जिल्हाभरातील सर्व मुख्याध्यापकांनी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज भरावेत असे आवाहन जवाहर नवोदय विद्यालयाचे प्रभारी प्राचार्य एस. जी. पवार यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 6 7
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे