pub-7425537887339079
ब्रेकिंग

टेम्भूर्णी येथील राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूलमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंती उत्साहात साजरी

0 4 6 9 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.24

राजमाता जिजाऊ इंग्लिश स्कूल, टेंभुर्णी येथे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी. स्वराज फलके , आराध्या उबरहंडे, रणवीर म्हस्के, आरुषी जाधव, सृष्टी सतीश चके, सृष्टी तायडे, नयना मोरे, स्वरूपा उखर्डे, आर्यन खांडेभराड , शिवराज जगदाळे, ऋतुजा मोरे विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक यांच्या जीवनकार्यावर भाषणे सादर केली. “स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच” हा त्यांचा प्रेरणादायी संदेश विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यात आला. मुख्याध्यापक संजय फलटणकर यांनी टिळकांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, शिक्षण, समाजजागृती आणि राष्ट्रनिर्मितीतील कार्य याविषयी मार्गदर्शन केले. टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव व शिवजयंती उत्सवांद्वारे राष्ट्रीय एकात्मता आणि स्वातंत्र्याची प्रेरणा दिली, यावर विशेष प्रकाश टाकण्यात आला. कार्यक्रमास शाळेचे प्राचार्य श्री. संजय फलटणकर, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वनिता सुद्रिक यांनी केले तर शेवटी राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 9 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे