pub-7425537887339079
ब्रेकिंग

सिद्धार्थ महाविद्यालयाच्या 33 खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड …….

0 4 9 7 3 3
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.27

क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 1 व जिल्हा क्रीडा अधिकारी व जिल्हा परिषद तसेच राज्य राखीव पोलीस दल गट क्र.3 जालना यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय 14, 17,19 वर्षातील मुला-मुलींचे मैदानी क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमध्ये सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाने जालना जिल्ह्यातील परतुर,भोकरदन, अंबड,जालना, घनसावंगी, मंठा, बदनापूर, या तालुक्याच्या संघावर मात करून विविध मैदानी क्रीडा स्पर्धा मध्ये यश संपादन केले. यामध्ये 100, 200, 400, 800, 1500, 3000 मीटर धावणे व अडथळयाच्या स्पर्धेत, तसेच ट्रिपल जंप, क्रॉस कन्ट्री, गोळा फेक, रिले इत्यादी.. खेळामध्ये जिल्हास्तरावर सिद्धार्थ महाविद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला .
तसेच गोळा फेक या स्पर्धेत,” रोहन दांडगे, 800 मीटर धावण्यामध्ये ऋतुराज जाधव, 1500 व 3000 मीटर धावण्यामध्ये व क्रॉस कंट्री स्पर्धे मध्ये आकाश राठोड व आदेश नरवडे, आकाश भिसे, ऋतुराज जाधव यांनी प्रथम क्रमांक मिळवला. तसेच मुलींच्या मैदानी स्पर्धेमध्ये 100 मीटर धावणे कु.तृप्ती जाधव, 200 मीटर धावणे कु. साक्षी देवडे, 400 मीटर धावणे कु शिवानी माकोडे, 800 मीटर धावणे कु .भाग्यश्री तागवाले प्रथम व द्वितीय तृप्ती जाधव व 1500 धावणे तृप्ती जाधव तसेच 3000 मीटर धावणे कु. भाग्यश्री तागवाले
व 400 मीटर अडथळा स्पर्धेमध्ये कु. प्रियंका जंजाळ व कु.शिवानी माकोडे, ट्रिपल जंप मध्ये कु.प्रज्ञा भिसे प्रथम व द्वितीयकु . प्रतिभा पवार तसेच 4×100 मीटर रिले मध्ये कु.भावना जाधव, कु.तृप्ती जाधव, कु. भाग्यश्री तागवाले, कु.साक्षी देवडे, कु.प्रियंका जंजाळ तसेच 4×400 मीटर रिले मध्ये कु नंदनी तारू, कु भाग्यश्री तागवाले, कु.तृप्ती जाधव, कु शिवानी माकोडे, कु साक्षी देवडे व क्रॉस कंट्री मध्ये कु.भाग्यश्री तागवाले, कु. साक्षी देवडे, कु. शिवानी माकोडे व कु. तृप्ती जाधव इत्यादी.. मुला-मुलींनी मैदानी क्रीडा स्पर्धेमध्ये जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक पटकावला .या सर्व खेळाडूंची विभागीय स्तरावर निवड झालेली असुन सिध्दार्थ महाविद्यालयाचे हे सर्व खेळाडू जालना जिल्ह्याचे नेतृत्व करणार आहेत.सिध्दार्थ महाविद्यालयांच्या
विद्यार्थ्यांनी मिळविलेल्या यशाबद्दल सिल्लोड शिक्षण संस्थेचे संस्थापक -अध्यक्ष मा .दादासाहेब म्हस्के, संस्थेचे सन्माननीय सचिव प्रा. डॉ .डॉ.राहुलजी म्हस्के, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सविता सिनगारे, उपप्राचार्य प्रो.डॉ. सुनील मेढे, उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे, सिद्धार्थ कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य विनोद हिवराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्री नरेंद्र पवार, श्रीमती लता लोंढे, आरती चिल्लारे, सिद्धार्थ कदम, आशिष जोगदंड, प्रमोद खरात, सोपान शिंदे, विकास काळे, तालुका क्रीडा संयोजक एकनाथ सुरुसे, बादशाह माघाडे, ओमराज उखर्डे व सिद्धार्थ कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालयाचे प्राध्यापकवर्ग व शिक्षकेतर कर्मचारी यांनी व विद्यार्थी-विद्यार्थिनी या सर्व खेळाडूंचे सत्कार करून सर्व खेळाडूंना पुढील क्रीडा स्पर्धेसाठी शुभकामना दिल्या. या सर्व खेळाडूचे तालुक्यातून व जिल्ह्यातून अभिनंदन व कौतुक होत आहेत. या सर्व खेळाडूंना मोलाचे मार्गदर्शन व प्रशिक्षण प्रा. उदय वझरकर, प्रा. वाहेद पटेल, प्रा. शिवाजी वैद्य, प्रा. अनिल वैद्य व आकाश छडीदार यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 9 7 3 3
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे