pub-7425537887339079
ब्रेकिंग

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मानवतेसाठी सामाजिक लढे उभारले – प्रो. डॉ.सतीश ठोंबरे

सिद्धार्थ महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प अर्पण

0 4 1 1 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख, दि.8

येथील सिद्धार्थ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती व्याख्यानमालेचे चौथे पुष्प अर्पण करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल म्हस्के होते तर प्रमुख वक्ते प्रोफेसर डॉ.सतीश ठोंबरे उपप्राचार्य प्रो.डॉ.सुनील मेढे उपप्राचार्य डॉ.श्याम सर्जे कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्रचार्य विनोद हिवराळे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रमुख वक्ते प्रो.डॉ.सतीश ठोंबरे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे सामाजिक व राजकीय विचार यावर आपले व्याख्यान दिले. डॉ.ठोंबरे म्हणाले डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतातील मानव हा केंद्रबिंदू मानून स्पृश्य,अस्पृश्यता हा भेदभाव नष्ट करण्यासाठी अनेक सामाजिक लढे उभे केले या लढ्यामुळे विशिष्ट जातीलाच फायदा न होता भारतातील अनेक जुनाट रूढी परंपरा मोडीत काढून एक सुदृढ समाज निर्मिती झाली . तसेच डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अंधश्रद्धेचे मूळ कारण अज्ञान असून हे अज्ञान दूर करण्यासाठी शिक्षण घेणे आवश्यक असल्याचे सांगितले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी 8 जुलै 1945 रोजी मुंबई येथे पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली आणि शिका संघटित व्हा आणि संघर्ष करा हा मंत्र त्यांनी या संस्थेच्या माध्यमातून दिला तसेच सिद्धार्थ महाविद्यालय मुंबई,मिलिंद महाविद्यालय औरंगाबाद या महाविद्यालयाची स्थापना करून उच्च शिक्षणाची दारे सर्वसामान्य विद्यार्थ्यांसाठी खुली केली तसेच 20 जुलै 1924 रोजी बहिष्कृत हितकारणी सभा स्थापन केली व या माध्यमातून दलितांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे आणि त्यांचे सामाजिक आर्थिक स्थिती सुधारणे हा उद्देश ठेवला.भारतीय राज्यघटनेत समता स्वातंत्र्य,बंधुता,अधिकार आणि कर्तव्य यांचा समावेश करून भारतातील प्रत्येक नागरिकाला समान पातळीवर आणण्याचे काम डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी केले असल्याचे सांगितले.अध्यक्षीय समारोपात महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.राहुल भाऊ म्हस्के यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्त व्याख्यानमालेत विविध विषयांवर सखोल अभ्यास करून प्रमुख वक्ते आपले व्याख्यान देत आहेत त्यामुळे आपल्या मनातील काही चुकीच्या संकल्पना दूर होऊन भविष्यात डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी चे आपले मत अभ्यासपूर्ण निर्माण होईल व त्याचा फायदा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर समाजातील इतर घटकांनाही होईल आणि खऱ्या अर्थाने हेच ह्या व्याख्यानमालेचे फलित राहील असे अध्यक्षीय समारोपात सांगितले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रो. डॉ.मनोज पगारे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.सरिता मणियार यांनी मानले व राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 1 1 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे