pub-7425537887339079
ब्रेकिंग

महावितरणच्या वीज तार, पाण्याच्या मोटारी व सोलार वायर चोरी करणारी टोळी जेरबंद

0 4 8 3 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

बदनापूर/प्रतिनिधी,दि.30

बदनापूर, दि. ३० ऑगस्ट २०२६ : महावितरणच्या पोलवरील जर्मन तार, शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी, वायर तसेच सोलार वायर चोरी करणाऱ्या टोळीचा बदनापूर पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी या कारवाईत ६ आरोपींना अटक करून तब्बल ८ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. आरोपींकडून चोरीच्या घटनांशी संबंधित १३ गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश आले आहे.
मागील काही दिवसांपासून काजळा, पानखेडा, ढोकसाळ, रोषणगाव, हळदगाव, बदनापूर तसेच कडेगाव शिवार, वाघाळ दाभाडी, डोंगरगाव व चनेगाव परिसरात शेतकऱ्यांच्या पाण्याच्या मोटारी, वीज तार व सोलार वायर चोरीच्या घटना घडत होत्या. त्यामुळे शेतकरी मोठ्या चिंतेत होते.
या घटनांना आळा घालण्यासाठी बदनापूर पोलिसांनी विशेष तपास पथके स्थापन केली. गेल्या १५ दिवसांपासून पोलिसांनी तांत्रिक तपासाच्या आधारे चोरट्यांचा माग काढत कारवाई केली. तपासादरम्यान १३ गुन्हे उघडकीस आणून ८ लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल तसेच दोन पिकअप वाहनांची अंदाजे १२ लाख रुपये किंमत, असा एकूण २० लाख १४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणात पोलिसांनी दिलीप गणेश शिंदे, विकास भाऊसाहेब मांढे, विजय बाबुराव पवार, संतोष तुकाराम पवार, अभिजीत विष्णू गारोळे आणि युसूफखान हनीफखान यांच्यासह इतर संशयितांवर कारवाई केली आहे. अटक आरोपींना न्यायालयाने ५ दिवसांची पोलीस कोठडी (PCR) सुनावली आहे.
या कारवाईमुळे शेतकऱ्यांच्या शेतातील विद्युत तार व मोटार चोरीच्या घटनांना आळा बसण्यास मदत होणार असून, चोरीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक तेगबिरसिंह संधू, अपर पोलीस अधीक्षक विक्रम साळी, उपविभागीय पोलीस अधिकारी अनंत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक एम. टी. सुरवसे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने केली. कारवाईत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे