pub-7425537887339079
ब्रेकिंग

भूखंडाचे आमिष दाखवून गुंतवणूक दारांची ५७ लाखांची फसवणूक.

उरण मध्ये फसवणूक करून जमीन विक्री करणारी बनावट टोळी सक्रिय. सीबीडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. उरण तालुक्यातील विंधणे वशेणी वेश्वी येथील जमीनीची जाहिरातबाजी.

0 4 2 5 7 9
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.7

उरण तालुक्यातील मोकळे भूखंड विकत देण्याचे आमिष दाखवून एका टोळीने १५ गुंतवणूकदारांकडून तब्बल ५७ लाख ३६ हजार रुपये उकळले आहे . त्यांना प्लॉट अथवा त्यांची रक्कम परत न करता फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. सीबीडी बेलापूर पोलिसांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी तेजस डाकी व त्याच्या इतर साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करून पुढील तपासाला सुरुवात केली आहे. या प्रकरणातील टोळीने जून २०२२ मध्ये सीबीडी परिसरात मे. लैंडलॉर्डस् रिअलटर्स या कंपनीचे कार्यालय सुरू केले होते. त्यानंतर त्यांनी उरण तालुक्यांतील विंधणे , वशेणी व पुनाडे या भागातील मोकळे प्लॉट विकत देण्याची जाहिरातबाजी केली होती. या जाहिरातबाजीला भुलून अनेक गुंतवणूकदारांनी या कंपनीकडे धाव घेतली. आरोपींनी या गुंतवणूकदारांकडून प्लॉटच्या मोबदल्यात मोठी रक्कम घेतली. मात्र, पैसे घेऊनही आरोपींनी प्लॉटचा दिला नाही आणि गुंतवणूकदारांचे पैसेही परत केले नाहीत.त्यामुळे गुंतवणूकदारांची मोठया प्रमाणात फसवणूक झाली. या प्रकरणात फसवणूक झालेल्यांमध्ये पुष्करसिंग रावत याच्यासह प्रवीण चंदनशिव, प्रदीप भाटकर, सुनील वाडकर, कांतीलाल पटेल, गौरव वरसोलकर, राजिंदर सिंग, हफिज अन्सारी, मनोज होळकर, नानी मंडल, तुकाराम ढेपे, सचिन शहाणे, सुनील शेट्टी व इतरांचा समावेश आहे. या सर्वांना मिळून ५७लाख ३६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला असून या १५ गुंतवणूकदारांनी एकत्र येऊन सीबीडी बेलापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.आर्थिक फसवणूक करून खोट्या जमीन खरेदी विक्री करणाऱ्या टोळ्या उरण तालुक्यात सक्रिय झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 5 7 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे