pub-7425537887339079
ब्रेकिंग

शालेय क्रीडा स्पर्धेत जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा…..प्रा. डॉ.राहुलजी म्हस्के

0 4 6 1 1 1
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.14

जाफराबाद तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले असून या स्पर्धा 10ऑगस्ट पासून प्रारंभ होत असुन 22 सप्टेंबर पर्यंत चालणार आहेत. आज दिनांक 13 जुलै रोजी सिद्धार्थ महाविद्यालया‌त जाफ्राबाद येथे शालेय क्रीडा शिक्षकांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे 01 व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जालना यांच्या संयुक्त विद्यमाने सिद्धार्थ कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय जाफराबाद येथे 13 जुलै रोजी क्रीडा शिक्षकांच्या बैठकीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत जाफराबाद तालुक्यातील शालेय क्रीडा स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून स्पर्धेला 10 ऑगस्ट पासून प्रारंभ होत आहे.या बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सचिव डॉ. राहुलजी म्हस्के हे होते तर जिल्हा क्रीडा अधिकारी मा.नरेंद्र पवार प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित होते.जिल्हा क्रीडा अधिकारी मा.नरेद्र पवार यांनी आपल्या भाषणात म्हणाले जाफराबाद तालुक्यातील सर्व माध्यमिक, उच्चमाध्यमिक व विविध महाविद्यालयात या क्रीडा स्पर्धेचे आयोजन करण्यात येईल.या स्पर्धा सुरळीत व चांगल्या वातावरणात पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य करावे.व जास्तीत जास्त संघांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन त्यांनी केले.दर वर्षी 49 खेळाचे आयोजन करण्यात येते, त्यापैकी जाफराबाद तालुक्यात 10 खेळ प्रकाराचे आयोजन करण्यात येणार आहे.या स्पर्धेत भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निर्गम उतारा, आधारकार्ड आसने आवश्यक आहे.कसलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्व शिक्षकांनी सहकार्य करावे.या बैठकीचे अध्यक्ष संस्थेचे सन्माननीय सचिव डॉ.राहुलजी म्हस्के यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले की,या वर्षी च्या सर्व स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्वोत्परी सहकार्य आमचे महाविद्यालय करीन, विविध क्रीडा स्पर्धेसाठी खेळाचे मैदान ही आम्ही उपलब्ध करून देऊ.10 ऑगस्ट रोजी फुटबॉल स्पर्धा जि.प.प्रशाला जाफराबाद येथे तर 11ऑगस्ट ते 13ऑगस्ट रोजी बुद्धीबळ,कॅरम,योगा,या स्पर्धा ज्ञानसागर विद्यालय सिपोरा अंभोरा येथे होणार आहेत.व्हाॅलीबाॅल,कुस्ती, कबड्डी,खो-खो स्पर्धा सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद व न्यू हायस्कूल विद्यालय जाफराबाद येथे संपन्न होणार आहेत.तसेच क्रीकेट स्पर्धा बी एस एन एल टाॅवर तर मैदानी स्पर्धा जिल्हा परिषद जाफराबाद येथे,क्राॅसकंन्टरी स्पर्धा रेपाळा रोड येथे संपन्न होणार आहेत.या स्पर्धा यशस्वी करण्याचे आवाहन तालुका संयोजक श्री एकनाथ सुरुसे व प्रा.वाहेद पटेल यांनी केले आहे. या नियोजनाची बैठक सिद्धार्थ महाविद्यालय जाफराबाद येथे संपन्न झाली .या बैठकीत सिद्धार्थ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रो डॉ सुनील मेढे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा विनोद हिवराळे, जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती लता लोंढे, श्रीमती आरती चिल्लारे, राज्य क्रीडा मार्गदर्शक सिद्धार्थ कदम तालुका क्रीडा संयोजक श्री. एकनाथ सुरुसे, प्रा. वाहेद पटेल, प्रा. उदय वझरकर, प्रा. शिवाजी वैद्य, महाविद्यालयाचे प्रसिद्धी प्रमुख प्रा. अनिल वैद्य, मुख्याध्यापक रमेश मुरकुटे, जाफ्राबाद तालुक्यातील क्रीडा शिक्षक पत्रकार बंधुं प्रा.पांडुरंग राऊत, नगरसेवक व क्रीडा शिक्षक मुजीब सर,दिपक खरात,निकम सर व जाफराबाद तालुक्यातील क्रीडा शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या बैठकीचे संचलन सिद्धार्थ महाविद्यालयातील प्राध्यापक अनिल वैद्य यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा.उदय वझरकर यांनी केले.या बैठकीचीसांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 6 1 1 1
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे