pub-7425537887339079
ब्रेकिंग

शिवसेना वर्धापन दिन व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्षपूर्तीनिमित्त शहरातील शाळेत शालेय साहित्य वाटप – विद्यार्थ्यांच्या चेहर्‍यावर आनंद

0 4 4 9 7 6
[sp_wpcarousel id="1375"]

 जालना/प्रतिनिधी,दि.23

शिवसेना वर्धापन दिन व शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या वर्षपूर्तीनिमित्त जालना शहरातील शाळेत शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे जिल्हाप्रमुख महेश नळगे व जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव, महिला जिल्हाप्रमुख रुपम घुगे यांच्या मार्गदर्शनखाली शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी जुना जालना कचेरी रोडवरील महानगर पालिकेच्या शाळेत जिल्हाप्रमुख मनिष श्रीवास्तव,जेष्ठ विधिज्ञ अ‍ॅड.बलवंत नाईक, शहरप्रमुख दिपक रणनवरे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख रुपमताई घुगे, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), अरविंद देशपांडे, अल्पसंख्याक शहरप्रमुख वसीम खान, उपशहरप्रमुख राजेश राऊत,संतोष क्षत्रिय, तुळशीराम काळे, शाळेतील शिक्षिका सविता गुळसकर,मयुरी मोताळे, पल्लवी कुलकर्णी, ज्योती जोशी यांच्या हस्ते शालेय विद्यार्थ्यांचा साहित्य वाटप करण्यात आले. नवीन जालना भागातील शिशु विहार, भोकरदन नाका येथील मराठा विद्यालय, भाग्यनगरातील सुरेखा प्राथमिक विद्यालय आदी शाळेत गरजवंत विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मान्यवरांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना शिक्षणाची गोडी लागावी व खर्‍या गरजवंताना हातभार लागावा, यासाठी शिवसेनेच्या वतीने शालेय साहित्य वाटप करण्यात येत असल्याचे सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 4 9 7 6
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे