pub-7425537887339079
ब्रेकिंग

शाहू महाराज जयंती समता दिन म्हणून साजरा

0 4 5 1 2 2
[sp_wpcarousel id="1375"]

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.27

तक्षशिला बौद्ध धम्म बहुद्देशीय सेवाभावी संस्था समर्थ नगर जालना आणि संविधान जागर अभियान यांच्या संयुक्त वतीने येथे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती ही समता दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या व्याख्यान मध्ये कामगार नेते कॉम्रेड अण्णा सावंत यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी अभ्यासपूर्ण माहिती देऊन सर्व सामाजबांधवना मार्गदर्शन केले.शाहू महाराज यांनी सर्व मागासवर्गीय विद्यार्थी साठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून दिल्या आणि अस्पृश्यांसाठी कोल्हापुरात ५०%आरक्षण दिले.सर्व धर्मभाव समान माननारा राजा असे अण्णा सावंत यांनी सांगितले.यानंतर प्राचार्य डॉ राजकुमार म्हस्के यांनीही छत्रपती शाहू महाराज यांच्या कार्याविषयी माहिती दिली.कार्यक्रमात समता दिन साजरा करताना तेथे समतेची चहा देऊन ममतेची वैचारिक ऊब व्याखानाद्वारे दिल्याबद्दल महेंद्र साळवे यांनी व्याख्याते अण्णा सावंत,प्राचार्य डॉ. म्हस्के आणि सर्व उपस्थितांचे आभार मानले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री निहाळ सर यांनी केले. यावेळी कार्यक्रमाला मिर्झा अफसर बेग (पीस फाऊंडेशन)छाया साळवे,धनश्री पगारे ,सुप्रिया बगळे,सुमनबाई वाघमारे प्रा.कांबळे सर,प्रा.गरड,अशोक गंगावणे,चंद्रकांत वाघमारे, प्रा.किशोर साळवे, प्रकाश जायेभाये,आकाश शरणागत,विशाल वाघमारे तक्षशिला बौद्ध विहाराचे अध्यक्ष भिकाजी साळवे यांची उपस्थिती होती.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 5 1 2 2
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे