नूतन सहाय्यक पोलीस निरीक्षक, अविनाश राठोड यांचा प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र शाखा जाफराबाद तर्फे सत्कार

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि.4
टेंभुर्णी तालुका जाफराबाद जिल्हा जालना, ऐतिहासिक ठेवा असलेल्या या गावच्या पोलीस स्टेशनमध्ये, पोलीस स्टेशनचे नूतन प्रभारी अविनाश राठोड यांची सहाय्यक पोलीस निरीक्षक पदी नुकतीच नियुक्ती झाली आहे. प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र शाखा जालना जाफराबाद तसेच लहू शास्त्र सेना तालुका जाफराबाद तर्फे सत्कार करण्यात आला. याप्रसंगी चर्चेदरम्यान त्यांना जाफराबाद तालुका तसेच टेंभुर्णी गावाच्या इतिहासाची माहिती देण्यात आली. विविध उपक्रमाबाबत ही चर्चा करण्यात आली. वाहनचालक व वाहतूक व्यवस्था यावर विशेष भर देण्यात आला. वाहतूक व्यवस्थेत व्यवस्थितरित्या शिस्त लागून कमी वयाच्या वाहनचालकाच्या बाबतीत सुद्धा चर्चा करण्यात आली. त्यांनी ऐतिहासिक गावाचा ठेवा आहे यावर विशेष लक्ष केंद्रित केले आणि अशा ऐतिहासिक गावात माझी नियुक्ती झाली यावर त्यांनी समाधान व्यक्त केले. याप्रसंगी प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र शाखा जालना चे उपाध्यक्ष प्रा. दत्ता देशमुख, प्रेस कौन्सिल ऑफ महाराष्ट्र जाफराबाद शाखेचे अध्यक्ष शेख अशपाक, व लहू शास्त्र सेनेचे जाफराबाद तालुका अध्यक्ष युसुफ शेख, यांच्यातर्फे नूतन प्रभारी यांचा यथोचित सत्कार करण्यात आला.
