सौ. संध्या संजय देठे यांची भाजपा महिला मोर्चा प्रदेश प्रतिनिधी पदी निवड

जालना/प्रतिनिधी, दि 18
भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या प्रदेशाध्यक्षा _मा. आमदार चित्राताई वाघ_ यांनी जालना जिल्हाध्यक्ष व जालना शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती _सौ. संध्या संजय देठे_ यांची _प्रदेश प्रतिनिधी तथा परभणी जिल्हा प्रभारी_ म्हणून निवड केली आहे.
संघटनात्मक बांधणी व संघटनात्मक कामकाजाचा आढावा घेण्यासाठी त्यांच्याकडे परभणी जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. बैठक, मंडळ गठीत व संघटन माहिती घेणे हे काम त्यांना पहावे लागणार आहे.
सौ. संध्या देठे या गेल्या 10 वर्षांपासून भारतीय जनता पार्टी महिला मोर्चामध्ये विविध पदांवर निस्वार्थपणे कार्यरत आहेत. त्यांच्या कामाची दखल घेऊन पक्षाने पुन्हा एकदा त्यांच्यावर ही महत्वाची जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीबद्दल _माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे “दादा” पाटील, माजी मंत्री आमदार बबनरावजी लोणीकर, आमदार तथा भारतीयजनता पार्टी जिल्हाप्रमुख नारायण भाऊ कुचे, आमदार संतोष भाऊ दानवे, माजी आमदार कैलास शेठ गोरंट्याल, जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, उपमहापौर राजेश राऊत, संगीताताई गोरंट्याल, निर्मलाताई दानवेभाजपा गटनेते महेश निकम, नगरसेवक अक्षय गोरंट्याल_ यांच्यासह भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सौ. देठे यांचे अभिनंदन केले आहे.
सौ. देठे यांनी ही जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडून पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा विश्वास व्यक्त केला.
“Live न्युज महाराष्ट्र”च्या परिवारातर्फे हार्दिक अभिनंदन!

