pub-7425537887339079
ब्रेकिंग

अहिल्यादेवी जयंती महोत्सवाची जय्यत तयारी!

0 4 3 8 6 9
[sp_wpcarousel id="1375"]

काजळा/भगवान धनगे,दि.30

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०१ व्या जयंतीनिमित्त बदनापूर तालुक्यातील काजळा येथे ३१ मे  रोजी भव्य जयंती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. अहिल्यादेवी होळकर समिती व समस्त धनगर बांधवांच्या वतीने आयोजित या महोत्सवात बाबासाहेब होळकर,प्रल्हाद ढवळे,राहुल भैय्या पवार,प्रा.उमेश शिंदे यांची व्याख्याने होणार आहे तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून मल्हार योद्धा मा.दिपकभाऊ बोराडे,बदनापूर चे आमदार मा.नारायण कुचे,उद्योजक नारायणराव चाळगे,उद्योजक ओमप्रकाश चितळकर तसेच मा. शिवप्रकाश चितळकर (सामाजिक कार्यक्रर्ते) मा. बद्रीनाना करे (उद्योजक छ. संभाजीनगर),मा. अंकुश दादा गटकाळ (पुण्यश्लोक सेना छ. संभाजीनगर) मा. भगवान मातले (धनगर संघर्ष समिती, जालना) या उपस्थितत पार पडणार आहे.

महोत्सवाची सुरुवात ३१ मे रोजी सकाळी प्रतिमापूजन व महाआरती होणार आहे. त्यानंतर  महाप्रसाद कार्यक्रम व नंतर व्याख्यानं व सायं 6 ते 10 भव्य मिरवणूक निघणार आहे.समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याच्या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.

दरम्यान31 मे रोजी सायंकाळी 6 ते रात्री १० वाजेपर्यंत भव्य मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला आहे. पारंपरिक वाद्यांचा निनाद, पिवळ्या पताकांची दिमाखदार सजावट आणि मोठ्या संख्येने सहभागी होणारे समाजबांधव यामुळे काजळ्यात उत्सवी वातावरण निर्माण होणार आहे.

अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी कार्याचा आदर्श पुढील पिढीसमोर ठेवण्याच्या उद्देशाने हा जयंती महोत्सव साजरा करण्यात येत असल्याचे आयोजकांनी सांगितले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 3 8 6 9
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे