राष्ट्रीय दुर्बल घटक शिष्यवृत्ती विद्यार्थी योजना2026 गुणवत्ता यादी जाहीर.
शांतिनिकेतन विद्यामंदिर शाळेचे चार विद्यार्थी एन एम एम एस गुणवत्ता यादीत झळकले..

जाफराबाद/दत्ता देशमुख,दि 29
केंद्रशासना मार्फत राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, नवी दिल्ली (एन सी ई आर टी) यांच्या द्वारा आयोजित ही परीक्षा इयत्ता आठवी च्या शेवटच्या टप्प्यात देशभरातील विविध भाषेत घेण्यात येते. जालना जिल्ह्यातील गुणवत्ता यादीत शांतिनिकेतन शाळेच्या चार विद्यार्थ्यांनी जागा मिळवली आहे. श्रद्धा सुनिल इंगळे, भाग्यश्री नंदकुमार गिराम, निशांत संतोष मोगले, हर्षवर्धन सोमनाथ धडे ही परीक्षा डिसेंबर 2025 मधे घेण्यात आली होती यात शाळेचे 26 उत्तीर्ण झाले असून या पैकी चार विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत. या विद्यार्थ्यांना मिळणार्या शिष्यवृत्ती मुळे पुढील शिक्षणासाठी प्रेरणा व आर्थिक मदत मिळणार आहे. या परीक्षेसाठी शाळेतील शिक्षक अशोक माधवले, मोहन भदाडे, सुर्यकांत बेले, शिवहरी मांटे, उद्धव वाघ नितिन पंडीत, किर्ती खैरे, विद्या चौधरी अरुणा आंधळे, यांनी परीश्रम घेतले तर शाळेचे मुख्याध्यापक श्री ज्ञानेश्वरजी गाढवे, प्रेमला पंडित यांचे मार्गदर्शन मिळाले होते. शाळने मिळवलेल्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष श्री भास्करराव अंबेकर, हरीहरजी शिंदे, प्रा.राम कदम, गणेशजी तरासे यांसह सर्व संचालक व पालकांनी कौतुक केले आहे….




