लातूरच्या युनिव्हर्सल कराटे अकॅडमीचे 10 खेळाडू भारतीय संघात नेपाळमधील आंतरराष्ट्रीय स्पर्धेत घेणार सहभाग

जालना /प्रतिनिधी,दि.29
लातूरच्या युनिव्हर्सल कराटे मार्शल आर्ट अकॅडमीच्या 10 विद्यार्थ्यांची 17 व्या आंतरराष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी भारतीय संघात निवड झाली आहे. काठमांडू येथे 2 ते 4 जून 2026 दरम्यान होणार्या या स्पर्धेत ते देशाचे प्रतिनिधित्व करणार आहेत.ङ्गङ्गराष्ट्रीय खेल कुद परिषद त्रिपुलेश्वर, काठमांडू आणि नेपाळ शोतोकान कराटे असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने ही स्पर्धा दशरथ स्टेडियम, रंगशाळा, काठमांडू येथे आयोजित केली आहे. स्पर्धेत भारतासह नेपाळ, बांगलादेश, पाकिस्तान, मलेशिया, भूतान आदी देशांचे खेळाडू सहभागी होणार आहेत.ङ्गङ्गमेहनत, जिद्द आणि सातत्यपूर्ण सरावाच्या बळावर या विद्यार्थ्यांनी भारतीय संघात स्थान मिळवले आहे. निवड झालेल्या खेळाडूंमध्ये प्रग्यान संतोष बजाज, शिवांश शशिकांत कनडे, अर्जुन अशोक बारबोले, यशदीप तुकाराम बांडे, समिहन हरीसर्वोत्तम जोशी, यश शिवाजी कोंडमगिरे, आर्फत इमरान शेख, चैतन्य ज्ञानोबा मुंडे, शिवम वाल्मीक सोमवंशी आणि सम्राट राजाभाऊ सूर्यवंशी यांचा समावेश आहे.निवड झाल्याबद्दल भाजप नेत्या श्रीमती अर्चना ताई पाटील चाकूरकर आणि भाजप युवा नेते श्री दिग्विजय भैया काथवटे यांनी विद्यार्थ्यांचा सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या.ङ्गङ्गया यशाचे श्रेय संस्थापक अध्यक्ष शिहाण तुषार रमेशप्रसाद अवस्थी तसेच सहप्रशिक्षिका सेन्साई प्रसाद माळी, सेन्साई गौरव कोरे, सेन्साई करण पवार आणि सेन्साई आदित्य जगदाळे यांच्या मार्गदर्शनाला जाते, असे अकॅडमीतर्फे सांगण्यात आले.या निवडीमुळे महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून, लातूरच्या क्रीडा क्षेत्रासाठी ही अभिमानाची बाब आहे.




