pub-7425537887339079
ब्रेकिंग

“लाल मैदानाची स्वच्छता मोहीम ; पण ‘सावरकर’ नावाचा फलकच गायब… प्रशासनावर सवाल!”

0 4 2 0 9 8
[sp_wpcarousel id="1375"]

उरण/विठ्ठल ममताबादे,दि.22

उरण नगरपरिषद हद्दीतील स्वातंत्र्यवीर सावरकर (लाल) मैदानावर गुरुवार, दिनांक २३ एप्रिल २०२६ रोजी विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्षा भावना घाणेकर यांनी दिली आहे. मात्र, या स्वच्छता मोहिमेच्या पार्श्वभूमीवर एक गंभीर बाब समोर आली आहे. मैदानाला सावरकरांचे नाव असले तरी प्रत्यक्षात नामफलकच नाही. नगरपरिषदेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत नियमित सफाई कामगारांसोबत अतिरिक्त मनुष्यबळही तैनात करण्यात येणार आहे. मैदानाची दयनीय अवस्था लक्षात घेता ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असून, नगराध्यक्षा स्वतः या मोहिमेत उपस्थित राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. यावेळी नागरिकांना, समाजातील नेत्यांना, व्यापारी-व्यावसायिकांना तसेच विशेषतः खेळाडूंना या मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. “मैदान आपले आहे, त्याची स्वच्छता राखणे ही सर्वांची जबाबदारी आहे,” असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. दरम्यान, या मैदानाला अधिकृतरित्या स्वातंत्र्यवीर सावरकर मैदान असे नाव देण्यात आले असले तरी प्रत्यक्षात येथे सावरकरांच्या नावाचा नामफलकच नसल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे हे मैदान आजही “लाल मैदान” या नावानेच ओळखले जात आहे. यावर उरण तालुका मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष घन:श्याम कडू यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत नगरपालिकेकडे तातडीने नामफलक लावण्याची मागणी केली आहे. “नाव दिलंय, पण फलक नाही… मग हे नाव कागदापुरतंच का?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. नागरिकांमधूनही याबाबत संताप व्यक्त होत असून, स्वच्छता मोहिमेसोबतच मैदानाच्या ओळखीचा प्रश्नही सोडवण्याची गरज व्यक्त केली जात आहे. स्वच्छतेसोबतच ओळखही स्पष्ट झाली पाहिजे, अशी भूमिका स्थानिकांकडून मांडली जात आहे. स्वच्छता मोहीम होईल, पण ‘सावरकर’ नावाला न्याय कधी मिळणार अशी चर्चा जनतेत सुरू आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा
बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 2 0 9 8
[metaslider id="1367"]
[sp_wpcarousel id="1375"]

Related Articles

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे