गणेशपूर येथे बुद्ध मूर्तीची स्थापना

टेंभुर्णी/दत्ता देशमुख,दि.12
गणेशपूर ता जाफ्राबाद येथे दि 10/5/2026 रोजी भन्ते महाथेरो सारिपुत्र यांच्या आधीप्त्याखाली व कार्यक्रमाचे मार्गदर्शक समाजसेवक फकिरा वाघ व बौद्ध उपासक उपासिका यांच्या उपस्थितीत पंचरगी ध्वजारोहण ध्वजा रोहन करुन बुद्ध मूर्तीची भव्य मिरवणूक काढण्यात आली भन्ते सारिपुत्र टेभूर्णीचे सरपंच गौतम म्हस्के,समाजकार्य महाविद्यालय रामनगर येथील प्राचार्य डॉ. राजकुमार म्हस्के व पंचक्रोशीतील बौद्ध उपासक व उपासिका यांच्या उपस्थितीत व सर्वांच्या साक्षीने बुद्ध मूर्तीची स्थापना करण्यात आली गौतम म्हस्के राजकुमार म्हस्के यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर महात्मा गौतम बुद्ध यांच्या तत्वावर मनोगत व्यक्त केले या नंतर भन्तेजी यांनी धम्मदेसना दिली. सायंकाळी भव्य असा “भीम गीताचा जागर महामानवाच्या विचारांच्या धम्म स्वरांचा” प्रस्तुत गायक राहुल हिवाळे यांच्या नेतृत्वाखाली बहारदार भीम ,बुद्ध गीतांचा कार्यक्रम करण्यात आला . याप्रसंगी श्वेता सभादिंडे यांनी बहारदार सादरीकरण केले. परिवर्तनवादी चळवळीचे गायक दीपक हिवाळे यांनी प्रबोधनात्मक गीत गायन केले. विकास वाघ “भिमराव झाला घटनापती” या गाण्याने उपस्थितांची मने जिंकली. लोक कलावंत ,शाहीर विजय मघाडे व संजय मघाडे यांनी लोक कला सादर करून कार्यक्रमाची रंगत वाढविली, ज्योती काकडे यांच्या “भीमराज की बेटी ” या गाण्यावर रसिकांनी ठेका धरला. .गुलाब वाघ, सुकेशनी बोर्डे, ढोलकी वादक निखिल लांडगे,कीबोर्ड प्लेयर अरविंद राजवंश ,PAD वादक अमोल जे ठी यांनी कार्यक्रमाची रंगत वाढविली. बहारदार असा कार्यक्रम झाल्यानंतर असा कार्यक्रम आज पर्यंत झाला नाही अशी प्रतिक्रिया उपस्थिती श्रोत्याकडून आल्या या कार्यक्रमा साठी परिश्रम घेण्यात आलेली कमिटी कार्यक्रमामाचे सूत्रसंचालन फकिरा वाघ यांनी केले तर भीमगीताचे सूत्रसंचालन ज्योती काकडे यांनी केले. संयोजक समिती निरांजन बुद्ध विहार गणेश पूर यांच्या वतीने राहुल मघाडे यांनी सर्व उपासक व उपस्थितांचे आभार मानले.



